आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

29 वर्षांपूर्वी जसे एमजीआर यांच्या पत्नी जिंकल्या होत्या, तसेच जिंकले पलानीस्वामी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - विधानसभेत जवळपास ५ तास चाललेल्या नाट्य आणि गोंधळानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई पलानीस्वामींनी शनिवारी विश्वासदर्शक मत जिंकले. जिंकण्याची पद्धत ठीक तशीच होती, जशी की २९ वर्षांपूर्वी अण्णाद्रमुक प्रमुख एमजीआरच्या पत्नी जानकींचे होते. मतदानाच्या वेळी डीएमकेचे ८९ आमदारांनी सदनातून बाहेर काढण्यात आले. काँग्रेस आणि आययूएमएलच्या नऊ सदस्यांनीही वॉकआऊट केले. 

सदनात राहिलेल्या उर्वरित १३३ आमदारांमधून १२२ जणांनी पलानीस्वामींच्या समर्थनार्थ मतदान केले. तथापि ११ जणांनी मात्र विरोधात मत टाकले. विश्वास ठराव जिंकण्यासाठी ६७ मते हवी होती. विश्वास मत जिंकल्यानंतर पलानीस्वामी जयललिता यांच्या समाधीवर पोहोचले आणि तेथे हमसून हमसून रडले. तेच माजी मुख्यमंत्री ओ पन्नीरसेल्वम यांनी म्हटले आहे की, जनताच ठरवेल की सदनात झालेले मतदान किती वैध होते ते. 
 
२९ वर्षांपूर्वी हेच झाले होते
१९८७ मध्ये अण्णाद्रमुक प्रमुख एमजीआर यांचे निधन झाले होते. पक्ष दोन गटात विभागला गेला होता. ९५ आमदार एमजीआर यांची पत्नी जानकी यांच्याबरोबर होते. जयललितांबरोबर फक्त ३५ आमदार होते. जानकी समर्थक ९५ आमदार स्टार हॉटेलमध्ये थांबविले गेले होते.

गुप्त मतदानाची मागणी; डीएमके आमदारांनी सभापतींना धक्के मारले, कपडे फाडले
११.०० वाजता : पलानीस्वामींनी विश्वास मत ठेवले. पन्नीरसेल्वम यांनी गुप्त मतदानाची मागणी उचलली. सभापतींनी ती फेटाळली.
११.२५ : मतदानाची तयारी सुरू. डीएमके व काँग्रेसने ही गुप्त मतदानाची मागणी केली. घोषणाबाजी सुरू
११.४० : सभापती म्हणाले- माझ्या निर्णयात कुणी हस्तक्षेप करू शकत नाही. मीडिया रूममध्ये कनेक्शन कापले, वीज बंद.
१२.१० : सदनात तोडफोड सुरू. खुर्च्या उचलल्या गेल्या. सभापतींचे माइक, टेबल तोडला. कामकाज एक वाजेपर्यंत स्थगित. डीएमके आमदारांनी सभापतींचा हात पकडून खेचला. धक्काबुक्कीत कपडे फाडले. 
१.१० : कामकाज दुसऱ्यांदा सुरू. गोंधळ झाल्याने मार्शल बोलावले.

पुढे काय...पलानीस्वामी सरकारचे भविष्य या तीन भूमिकांकर्त्यांच्या हातात
१. राज्यपाल : राष्ट्रपती राजवट लावू शकतात.
सभागृहाबाहेर केल्यानंतर द्रमुकने राज्यपालांकडे तक्रार केलेली आहेच. तपासाच्या आधारावर त्यांच्याकडे राष्ट्रपती राजवटीचा पर्याय खुला आहे. असेच एमजीआर यांच्या पत्नी जानकी यांच्या प्रकरणात २९ वर्षांपूर्वीही झाले.

२. निवडणूक आयोग : शशिकलांची नियुक्ती आणि निर्णय धोक्यात
पन्नीरसेल्वम गटाने शशिकला यांच्या महासचिव म्हणून झालेल्या नियुक्तीला निवडणूक आयोगाकडे आव्हान दिलेले आहेच. अशात आयोगाने नियुक्ती जर चुकीची ठरवली तर त्यांच्यासाठी केलेल्या निर्णयाच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल.

३. सर्वोच्च न्यायालय : द्रमुक वा पन्नीरसेल्वम यांनी आव्हान दिले तर
द्रमुक आणइ पन्नीरसेल्वम गोटाने जर ठरविले तर मत परीक्षणाच्या वैधतेलाही सर्वोच्च न्यायालयातही आव्हान देऊ शकतात. तथापि, अद्याप तरी कोणत्याच गटाने सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाण्याचे संकेत दिलेले नाहीत.

मी कसे सांगू विधानसभेत माझ्याबरोबर काय झाले? माझा शर्ट फाडला. मला अपमानित केले गेले. मी तर माझे काम करत होतो. -पी. धनपाल, सभापती, तामिळनाडू विधानसभा
 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... तमिळनाडू विधानसभेत राड्याचा व्हिडिओ आणि फोटोज... 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...