आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या तरुणीने फेसबुकवर BJP ला विचारला हा प्रश्न, मिळाली बलात्काराची धमकी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंखुडी पाठक यांना सोशल मीडियावर बलात्काराची धमकी मिळाली. - Divya Marathi
पंखुडी पाठक यांना सोशल मीडियावर बलात्काराची धमकी मिळाली.
लखनऊ - समाजवादी पक्षाची प्रवक्ता पंखुडी पाठकला त्यांच्या फेसबुक अकाउंटवर लखनउत राहणाऱ्या एक तरुणाने बलात्कार करण्याची धमकी दिली आहे. यानंतर पंखुडी पाठक यांनी दिल्लीतील घराजवळच्या मायापुरी पोलिस स्टेशनमध्ये केस दाखल केली आहे. पंखुडी पाठक यांनी divyamarathi.com शी बातचीत करताना म्हटले की, यूपीत कायद्याचा धाक राहिलेला नाही. हेच कारण आहे की, कुणीही कुणाला काहीही म्हणत आहे. सोशल मीडियापासून ते सार्वजनिक जागांवर लोक महिलांबद्दल बिनधास्त आक्षेपार्ह शब्द वापरत आहेत. यूपीत अँटी रोमियो पथक कशाप्रकारे काम करतंय हेच यावरून दिसून येते.
 
या पोस्टमुळे मिळाली बलात्काराची धमकी 
- वास्तविक, पंखुडी पाठक यांनी फेसबुकवर पोस्ट करून सल्ला मागितला होता. पोस्टमध्ये पंखुडी यांनी विचारले होते की, "असे कोणते काम आहे, जे भाजपच्या लोकांनी केलेले नाही."
- फेसबुकवर पंखुडी पाठकच्या पोस्टवर कॉमेंट करत लखनऊमध्ये राहणाऱ्या पंकज शुक्लाने म्हटले होते की, "तुझा तर रेपच झाला पाहिजे. तू कशी काय वाचलीस?" यानंतर पंखुडी पाठकच्या समर्थनासाठी एक हजारपेक्षा जास्त जणांनी रिट्विट करत खूप काही म्हटले.
 
"हा अँटी स्क्वॉड आजपर्यंत समजलेला नाही"
- पंखुडी पाठकने म्हटले की, ज्याप्रकारे मला कॉमेंट करण्यात आली, त्यावरून असे वाटते की यूपीमध्ये जंगलराज सुरू आहे. ही राम राज्यचा नारा देणाऱ्यांचे सरकार आल्यानंतरची स्थिती आहे."
- मला आजपर्यंत समजलेले नाही की, अँटी रोमियो स्क्वॉड कशाप्रकारे काम करत आहे. येथे दररोज खुलेआम गुन्हेगार बाहेर फिरतात. तरुणी, लहान मुलींचा रेप करतात. त्यांच्या हक्कात आवाज उचलला, तर अशा घाणेरड्या मानसिकतेचे लोक सोशल मीडियावर येऊन रेपची धमकी देतात.
- हा पंकज शुक्ला नावाचा माणूस ज्याने मला धमकी दिली, तो यूपी पॉवर कॉर्पोरेशनमध्ये काम करणारा आहे. त्याचा नंबरही त्याच्यावर देण्यात आलेला आहे. त्याच्याशी अनेक लोकांनी संपर्क केला, त्याने त्यांनाही मारण्याची धमकी दिली आहे."
- कायद्याचा धाक जेव्हा संपून जातो तेव्हा अशी घाण माणसे समोर येतात. त्यांना माहितीये, त्यांचे कुणीच काही वाकडे करू शकणार नाही.
- मी याप्रकरणी दिल्लीतील मायापूरी पोलिसांत तक्रार दिली आहे. आता यूपीचे सरकार महिलांच्या सन्मानासाठी किती कटिबद्ध आहे, हेच पाहायचेय!'
 
कोण आहे पंखुडी पाठक?
- सपाच्या दिल्ली यूथ विंगमधून करिअरची सुरुवात केली. 2017 मध्ये निवडणुकांदरम्यान सपा प्रवक्ता बनल्या.
- याआधीही भाजप प्रवक्ते प्रेम शुक्ला यांनी एक चॅनलमध्ये डिबेटदरम्यान चुकीच्या शब्दांचा प्रयोग केला होता. यानंतर पंखुडी पाठकला तळागाळातून खासकरून यूथ लीडर्सचा सपोर्ट मिळाला.
- सध्या त्या सपाच्या प्रदेश प्रवक्ता आहेत. डिंपल यादव यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या पंखुडी पाठक यांना सपा परिवारात महत्त्वाचे स्थान आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, बातमीशी संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...