आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयललितांना आधी धक्का दिला, नंतर हॉस्पिटलमध्ये दाखल केले; AIADMK नेत्याचा दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रदीर्घ आजारानंतर 5 डिसेंबर रोजी जयललितांचे निधन झाले होते. - Divya Marathi
प्रदीर्घ आजारानंतर 5 डिसेंबर रोजी जयललितांचे निधन झाले होते.
चेन्नई - AIADMK चे ज्येष्ठ नेते पी.एच. पांडियन यांचा दावा आहे की अम्मा (जयललिता) यांना त्यांच्या पोएस गार्डन येथील राहात्या घरी कोणीतरी धक्का दिला होता. तामिळनाडू विधानसभेचे माजी सभापती पांडियन यांचे म्हणणे आहे की या घटनेनंतरच जयललिता यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. जयललिता यांना गेल्या वर्षी 22 सप्टेंबरला अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले होते. उपचारादरम्यान 5 डिसेंबरला त्यांचे निधन झाले होते. 
न्यूज एजंसीच्या रिपोर्टनुसार, पांडियान यांचा दावा आहे की माजी मुख्यमंत्री जयललिता यांचे निधन नैसर्गिक नव्हते. 

- माजी मुख्यमंत्री आणि जयललितांचे निकटवर्तीय ओ. पनीरसेल्वम यांच्या निवासस्थानी माध्यम प्रतिनिधींसोबत बातचीत करताना पांडियन म्हणाले, 'धक्का दिल्यानंतर अम्मा खाली पडल्या. त्यानंतर त्यांच्यासोबत काय झाले हे कोणालाच माहित नाही.'
- 'एका पोलिस अधिकाऱ्याने अॅम्ब्यूलन्स मागवली अम्माला हॉस्पिटलला हलविण्यात आले. अम्मा अपोलो हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर तेथील 27 सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यात आले. हे कॅमेरे का बंद ठेवण्यात आले याची माहिती अपोलो हॉस्पिटल प्रशासनाने दिली पाहिजे.'
 
मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी खुलासा का? 
- पांडियन यांचा दावा आहे की अम्माचा मृत्यू 4 डिसेंबर रोजी सायंकाळी 4.30 वाजता झाला होता. मात्र हॉस्पिटलने 5 डिसेंबरला याची घोषणा केली. त्यांच्या कुटुंबातील कोणत्या सदस्याने त्यांच्यावरील उपचार थांबवण्यास सांगितले होते, हे देखिल समोर आले पाहिजे. 
- पांडियन यांना जेव्हा विचारण्यात आले, की तुम्हाला ही सर्व माहिती कशी मिळाली तेव्हा ते म्हणाले, 'माझे स्वतःचे सोर्सेस आहेत. मी स्वतः याची चौकशी करीत आहे. अम्माच्या उपचारादरम्यान अनेक संशायस्पद घटना घडल्या आहेत.'
- ते म्हणाले, 'अम्मा मुख्यमंत्री होत्या. त्यांना एसपीजी सुरक्षा होती. एसपीजी अॅक्ट नुसार त्यांचे भोजन तपासले जात होते का ? त्यांना हॉस्पिटलमध्ये जाण्याची परवानगी का नव्हती?'
 
सिंगापूरहून डॉक्टर बोलावण्याची काय गरज होती ? 
- पांडियन यांनी अम्माच्या मृत्यूवरुन अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले, 'अपोलो हॉस्पिटलमध्येच अनेक फिजिओ असताना अम्मांच्या उपचारासाठी सिंगापूरहून फिजिओ का बोलवले गेले?'
- 'जयललिता हॉस्पिटलमध्ये असताना 3 जागांवर पोटनिवडणूक झाली होती. यावेळी AIADMK उमेदवारांच्या ए आणि बी फॉर्मवर अम्मांच्या स्वाक्षरीच्या ठिकाणी त्यांच्या अंगठाचे ठसे होते. दुसऱ्या कागदपत्रांवरही त्यांचे असेच ठसे घेण्यात आले होते का ?' असा सवाल पांडियन यांनी केला आहे. हॉस्पिटलमधील डॉक्टर, आणि त्यांच्या सोबत असलेल्या लोकांनी याचे उत्तर देण्याची मागणी पांडियन यांनी केली आहे. 
- अम्माला जून 2015 मध्ये उपचारांसाठी सिंगापूरला घेऊन जाण्यासाठी चेन्नई विमानतळावर पॅरा-अॅम्ब्यूलन्स हेलिकॉप्टर तैनात होते. मात्र त्यांना सिंगापूरला नेण्यात आले नाही. हे कोणी थांबवले होते. याचाही खुलासा झाला पाहिजे, असे पांडियन म्हणाले. 
बातम्या आणखी आहेत...