आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिहारमधील ८५ टक्के डॉक्टर नरपिशाच, जल्लाद, पप्पू यादव यांचे वादग्रस्त वक्तव्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - बिहारमधील ८५ टक्के डॉक्टर नरपिशाच आणि जल्लाद आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रीय जनता दलाचे खासदार पप्पू यादव यांनी केले आहे. पत्रकारांशी बोलताना यादव यांनी राज्यातील डॉक्टर, नोकरशहा आणि राजकीय नेत्यांवर चांगलेच तोंडसुख घेतले.
‘इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) आणि बिहार आरोग्य सेवा संघटना (भासा) या डॉक्टरांच्या संघटनांना सामान्य जनतेशी काहीही देणेघेणे नाही. राज्यातील नोकरशाही भ्रष्टाचाराने पूर्णपणे पोखरली गेली आहे. राजकीय नेत्यांनी राजकारणाला वेश्याव्यवसायापेक्षाही खालच्या दर्जावर नेले आहे,’ असा खळबळजनक आरोपही पप्पू यादव यांनी केला.