आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: आई-वडीलांची अशीही जबरदस्ती, 11 महिन्यांच्या बाळाचे सोलो पॅरॅसेलिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कान्नूर (तमिळनाडू)- आई आणि वडील आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पाल्यावर कोणते दडपण आणतील याचा काही नेम राहिला नाही. परिक्षेत पहिल्या क्रमांकाने पास व्हायलाच हवे, खेळात पुढे राहायलाच हवे, चांगली नोकरी मिळायलाच हवी इत्यादी इत्यादी आता इतिहास झाला आहे. तमिळनाडूच्या पालकांनी तर चक्क 11 महिन्यांच्या त्यांच्या बाळाला सोलो पॅरॅसेलिंग करायला लावले.
या बाळाच्या आई-वडीलांविरुद्ध बाल गुन्हेगारी कायद्यांतर्गत पोलिस कारवाई करण्यात आली आहे. सेक्शन 23 अंतर्गत तक्रार नोंदविण्यात आली असून दोघांना सहा महिने तुरुंगवास किंवा आर्थिक दंड किंवा दोन्ही होऊ शकते.
यासंदर्भात कान्नूरचे पोलिस आयुक्त पी. एन. उन्नीराजा यांनी सांगितले, की आई-वडीलांचा आणि पॅरॅसेलिंगची सुविधा पुरविणाऱ्या संस्थेच्या मालकाचा आज जबाब नोदविला जाईल. यासंदर्भात प्रचंड जनक्षोभ उसळून आला असून केरळच्या मानवाधिकार आयोगाने तक्रार दाखल करून घेतली आहे.
याबाबत आयोगाचे प्रमुख तपास अधिकारी डीआयजी श्रीजिथ यांनी सांगितले, की या बाळाच्या आईला उड्डाणाचा 60 तासांचा अनुभव आहे. बाळालाही याचा अनुभव मिळावा, असे तिला वाटत होते. यासाठी आपले बाळ लहान आहे याचा विचारही केला नाही. विशेष म्हणजे समुद्र किनाऱ्यावर करण्यात येणाऱ्या पॅरॅसेलिंगचे काही नियम निश्चित नाहीत. त्यामुळे कारवाई करण्यात अडचणी येत आहेत.
पुढील स्लाईडवर बघा, आई-वडीलांनी बाळाला कसे पॅरॅसेलिंग करायला लावले.... व्हिडिओ...
व्हिडिओ सौजन्य- मीडिया वन