आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: रेकॉर्ड ब्रेक बर्फवृष्टीनंतर काहीसा असा दिसत आहे पराशर सरोवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पराशर (हिमाचल प्रदेश) - मनात जिद्द बाळगल्यास काहीही अशक्य नाही हेच सिद्ध करणारे हे छायाचित्र आहे. हिमाचल प्रदेशात तुफानी बर्फवृष्टी हा तसा काही नवा अनुभव नाही. परंतु समुद्रसपाटीपासून हजार फूट उंचीवर असलेल्या पराशर सरोवर परिसरात २४ वर्षांनंतर यंदा प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात बर्फाचे थर साचल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. या मार्गावर पाच फूट उंचीचे बर्फाचे थर साचल्याने या सरोवराकडे जाणारे मार्ग १५ दिवसांपासून बंदच आहेत. पर्यटकदेखील येणे बंद झाले आहे. त्यामुळे पराशर सरोवरला जायचे आहे म्हटल्यावर लोकांनी छायाचित्रकार, वार्ताहरांना मरायचे आहे काय? अशी विचारणा केली. एकदा प्रवास सुरू झाल्यावर मध्ये थांबणे अशक्य होते. बर्फात अडकलो तर पुन्हा परतणे कठीण होते. ितथवर येण्यास गाइड तयार नव्हता. अशा स्थितीत दोन तरुणांना कसेबसे तयार करून बर्फातून १० किमींचा प्रवास सुरू केला.

१२ तास क्षणोक्षणी संघर्ष
चढाईदरम्यानपवन (३०) पूरन (२६) हे तरुण गाइड म्हणून मदतीला आले. त्यांनी जंगलातील ट्रेकिंगचा मार्ग दाखवला. चार किमीनंतर चढण सुरू झाली. चोहोबाजूला बर्फच बर्फ दिसत होता. डोंगर चंदेरी दिसत होते. १५-१६ किमींच्या चढाईनंतर पाणी संपले. बर्फ खाऊन तहान भागवली. अखेर बारा तासांनी पराशर सरोवराजवळ पोहोचलो. मावळतीच्या सूर्यांची किरणे पसरल्याने चंदेरी परिसर सोनेरी झाला होता. निसर्गाचे विलोभनीय सौंदर्य कॅमेऱ्यात टिपत मोहीम फत्ते झाल्याचे अनोखे समाधान परतीच्या प्रवासात टीमला ऑक्सिजन म्हणून पुरले.