आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियकर-प्रेयसीने घरातून पळून जाऊन केले लग्न, घरच्यांनी पाहिले तेव्हा तलवारीने केले वार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बांसवाडा (राजस्थान) - प्रेम करणारे कोणत्याही जाती-धर्मातील असू द्या किंवा कुठल्याही प्रदेशातील, त्यांना कुटुंबियांकडून होणारा विरोध हा समान असतो. राजस्थानातील बांसवाडा जिल्ह्यातील एका प्रेमी युगुलाने घरच्यांचा विरोध डावलून एकमेकांना जीवनसाथी म्हणून निवडले. मात्र मुलीने आई-वडिलांच्या विरोधात जाऊन केलेले लग्न त्यांना पसंत पडले नाही आणि संधी मिळाल्यानंतर वडिल आणि भावांनी मुलीच्या नवऱ्यावर तलवार आणि चाकूने प्राणघातक हल्ला केला. जखमी पतीला सोबत घेऊन पोलिस स्टेशनमध्ये गेलेल्या नाजमीनला पोलिसांची टोलवा-टोलवीही झेलावी लागली.

चाकू आणि तलवारीने हल्ला
- शनिवारी रात्री 12 वाजता तौफिक रोजचे काम अटोपून घरी परतत होता. बसस्टँडजवळ एका चहाच्या टपरीवर तो थांबला. तिथे नाजमीनचा पिता लियाकत खान, आई शहजादी आणि दोन भाऊ इरफान खान आणि इम्रान उर्फ रिंकू यांनी त्याच्यावर चाकू आणि तलवारीने हल्ला केला.
- इरफानने तौफिकच्या छातीवर चाकूने वार केला, त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्या ओरडण्याच्या आवाजाने आसपासचे लोक जमा झाले आणि त्यांनी हल्लेखोरांच्या तावडीतून तौफिकला सोडवले. दरम्यान इम्रानने तौफिकवर तलवारीने वार केला होता.

लग्नानंतर कित्येक वर्षांनी केला हल्ला
- तौफिक आणि नाजमीनल्या लग्नाला काही वर्षे झाली आणि आता त्यांना पाच महिन्याचा मुलगा आहे.
- दोघांनी कुटुंबियांच्या विरोधात जाऊन लग्न केले होते. हे मुलीच्या आई-वडिलांना जास्त बोचत होते.
- मुलीच्या संतप्त आई-वडिल आणि भावांनी अखेर डाव साधला आणि युवकावर चाकू आणि तलवारीने हल्ला केला.
- जखमी युवुकाला एमजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर झालेल्या हल्ल्याची तक्रार देण्यासाठी त्याची प्रेमिका नाजमीन रविवारी थेट पोलिस अधीक्षकांच्या (एसपी) घरी पोहोचली. नाजमीनने थेट एसपींना लिखित तक्रार दिल्यानंतर पोलिस कारवाईला सरसावले.

(Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...