आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वार-पलटवार! परेश रावल यांनी 'चाय वाला, बार वाला' ट्वीट केले डिलीट, माफीही मागितली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भाजपचे खासदार आणि अॅक्टर परेश रावल यांनी नरेंद्र मोदींबाबतचे ट्वीट डिलीट केले आहे. परेश यांनी मंगळवारी ट्वीटमध्ये लिहिले होते, आमचा चहावाला कधीही तुमच्या बार वाल्यापेक्षा चांगला आहे. यूथ काँग्रेसच्या ऑनलाइन मॅगझिन युवा देशमध्ये मोदींचे आपमानास्पद MEME ट्वीट करण्यात आले होते. त्यात मोदी  डोनाल्ड ट्रम्प आणि ब्रिटिश पीएम थेरेसा मे बरोबर चर्चा करताना दाखवले होते. नंतर ते डिलीट करण्यात आले. त्यावर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी राहुल गांधींकडे उत्तर मागितले होते. 


परेश रावल यांनी मागितली माफी 
- न्यूज एजन्सी एएनआयच्या नुसार परेश रावलने त्यांच्या ट्वीटबाबत माफीही मागितली आहे. त्यांनी लिहिले, त्याला चांगले ट्वीट म्हणता येणार नाही, त्यामुळे मी ते डिलीट केले. एखाद्याच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो. 


असा सुरू झाला वाद 
- काँग्रेसचे ऑनलाइन मॅगझिन 'युवा देश' ने मंगळवारी नरेंद्र मोदींवर एक अपमानास्पद MEME ट्वीटर हँडलवर पोस्ट केले होते. 
- त्यात मोदी डोनाल्ड ट्रम्प आणि थेरेसा मे यांच्याशी बोलत असल्याचे दिसते. त्यात मोदींच्या फोटोच्या वर लिहिले होते, तुम्ही पाहिले विरोधक माझे कसे-कसे मेमे तयार करतात?
- ट्रम्पच्या फोटोवर लिहिले होते, त्याला उसे मेमे नव्हे मीम म्हणतात. 
- फोटोत उजव्या बाजुला ब्रिटनच्या पीएम थेरेसा मे आहेत. त्यांच्या फोटोच्या वर लिहिले होते, 'तू चाय बेच' 
- आणकी एक MEME पोस्ट केले, त्यात भाषणात मोदी असे म्हणत आहेत, विकासासाठी 22 वर्षे पुरेसी नाहीत. आम्हाला आणखी एक संधी हवी आहे. 
- त्यांना एक मुलगी उत्तर देत आहे, दूसरों के बाथरूम की बजाय समय पर अपने बेडरूम में झांक लिए होते तो विकास आज घोड़ी चढ़ रहा होता.. 

 

पुढे पाहा परेश रावल यांचे ट्वीट्स आणि युवा देशचे MEME असलेले ट्वीट...

बातम्या आणखी आहेत...