आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Parliament Monsoon Session Day 2 Updates Mayawati Says Will Resign As Rajya Sabha

दलितांबाबत सरकार बोलू देत नसल्याचा आरोप; मायावतींनी दिला राज्यसभेचा राजीनामा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- बसप प्रमुख मायावती यांनी मंगळवारी नाट्यमयरीत्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. सुरुवातीस सभागृहात बोलण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याचा अारोप करत त्यांनी राजीनामा देण्याची धमकी दिली होती. सायंकाळपर्यंत त्यांचा राजीनामा मंजूर झाला नव्हता.

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मायावती राज्यसभेत सहारनपूर हिंसाचारावर बोलत होत्या. हा जातीय हिंसाचार सांगितला जात असला तरी दलितांना धमकावण्याचीही कारवाई होती. संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले, मायावती दलितांच्या नावावर राजकारण करत आहेत. 

दरम्यान, उपसभापती पी.जे. कुरियन यांनी त्यांना मिळालेली ३ मिनिटे संपल्याचे सांगितल्यावर मायावती संतप्त झाल्या. त्या म्हणाल्या, एवढ्या महत्त्वाच्या मुद्द्यावर माझे म्हणणे ऐकून का घेतले जात नाही, मी ज्या समाजातून आले आहे,त्यांचा विषय सभागृहात मांडू शकत नाही. याच्या निषेधार्थ त्यांनी सभात्याग केला. त्यांच्या समर्थनार्थ विरोधकांनीही सभात्याग केला. यादरम्यान सत्ताधारी पक्षाचे सदस्यही गोंधळ करू लागले. सायंकाळी तीनपानी राजीनामा सुपूर्द केल्यानंतर मायावती म्हणाल्या, ‘सत्ताधारी माझे म्हणणे मांडण्यासाठी वेळ देत नसतील तर मी राजीनामा देणेच योग्य आहे.’

नऊ महिने कार्यकाळ बाकी
राज्यसभेत मायावती यांचा कार्यकाळ एप्रिल २०१८ मध्ये संपत आहे. उत्तर प्रदेश विधानसभेत त्यांचे १९ अामदार आहेत. एप्रिलमध्ये होणाऱ्या निवडणुकीत त्यांची फेरनिवड कठीण आहे. हे पाऊल दलितांच्या मुद्द्यावर हौतात्म्य दाखवण्याच्या रणनीतीचा भाग दिसत आहे. दलित राष्ट्रपतिपदासह अन्य कामांतून भाजप दलितांमध्ये वेगाने जम बसवत आहे. 

दलित संरक्षणात आडकाठी
मी सभागृहात दलितहिताचा मुद्दा उचलू शकत नसेन तर माझ्या राज्यसभेत राहण्यात काय अर्थ आहे. मी माझ्या समाजाचे संरक्षण करू शकत नाही. मला माझे म्हणणे मांडू देण्याची संधी दिली जात नसेल तर मला सभागृहात राहण्याचा अधिकार नाही. मी सभागृहाच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा देत आहे.

संसदेत गदारोळ, लोकसभेत तीन विधेयके सादर 
जमावाच्या मारहाणीत मृत्यू, गोरक्षकांचा हिंसाचार, शेतकऱ्यांच्या समस्येसारख्या मुद्द्यांवर अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही सभागृहांचे कामकाज ठप्प झाले. राज्यसभा तीनदा व लोकसभा एकदा स्थगित करावी लागली. यादरम्यान काँग्रेस, राजद, डावे पक्ष, तृणमूल काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांचे सदस्य सरकारविरोधात एकजूट झाले. असे असले तरी सरकारने गदारोळात प्राचीन स्मारक व पुरातत्त्व स्थळ तसेच अवशेष(दुरुस्ती) विधेयक २०१७, भारतीय पेट्रोलियम व ऊर्जा संस्था विधेयक २०१७ व अचल संपत्ती अधिग्रहण दुरुस्ती विधेयक २०१७ सादर केले.

एका वाक्याऐवजी तीन पाने दिल्याने राजीनामा फेटाळण्याची शक्यता 
उपसभापती मायावती यांचा राजीनामा फेटाळू शकतात. नियमानुसार राजीनामा केवळ एका वाक्यात द्यावयाचा असतो. मात्र, मायावती यांनी तो तीन पानात लिहिला.
 
विरोधकांनी केली सरकारला घेरण्याची तयारी 
- विरोधकांनी सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. 18 विरोधीपक्ष एकत्र येऊन त्यांनी रणनीती आखली आहे. 
- विरोधकांनी ज्या मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची तयारी केली आहे त्यात नोटबंदीनंतर लोकांच्या नोकरी आणि जीवनावर झालेला वाईट परिणाम, जीएसटी लागू करण्यासाठीची सरकारची घाई, शेतकरी आत्महत्या, देशभरात दलित - मुस्लिमांवर वाढते अत्याचार, देशाचा  संघराज्याचा ढाचा वाचवण्याचे आव्हान आणि फेक न्यूज पसरवून लोकांना चिथवले जाते अशा मुद्द्यांचा समावेश आहे. 
बातम्या आणखी आहेत...