आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅनडा निवडणूक : प्रथमच जिंकले भारतीय वंशाचे 19 सदस्य, नव्या PMने केला भांगडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅनडाच्या निवडणुकीत विजयी झालेली भारतीय वंशाची सोनिया सिद्धू - Divya Marathi
कॅनडाच्या निवडणुकीत विजयी झालेली भारतीय वंशाची सोनिया सिद्धू
चंदीगड/टोरांटो - कॅनडाच्या सार्वत्रिक निवडणुकीत यंदा 19 इंडो-कॅनडियन विजयी झाले आहेत. त्यात 17 पंजाबी आहेत. कॅनडाच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये (संसद) प्रथमच भारतीय वंशांचे एवढे लोक निवडून आले आहेत. 2007 मध्ये 8 पंजाबी खासदार होते. संसदेच्या 338 जागांमध्ये लिबरल पार्टी 184 सदस्यांसह पूर्ण बहुमताने विजयी झाली आहे. 43 वर्षीय जस्टिन ट्रुडो पंतप्रधानपदी विराजमान होतील. पक्षाने बहुमत मिळवल्यानंतर त्यांनी आनंदात विमानतळावरच भांगडा केला.
 
कॅनडा निवडणूक
 >> लिबरल पार्टी दहा वर्षानंतर सत्तेत परत आली आहे. त्यांचे विरोधी कंझर्व्हेटीव पक्षाला 99 जागा मिळाल्या आहेत.
 >> पंतप्रधान स्टीफन हार्पर यांनी राजीनामा दिला आहे.
 >> एनडीपीने चुकीच्या मुद्यांवर निवडणूक लढविल्यामुळे त्यांना फक्त 44 जागांवर समाधान मानावे लागले. ब्लॉक क्यूबॅक 10 आणि  ग्रीन पार्टीला एक जागा मिळाली आहे.
 >> पंतप्रधान पदी विराजमान होणारे जस्टिन तीनवेळा पंतप्रधान राहिलेल्या पियरे ट्रुडो यांचे चिरंजीव आहेत. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कॅनडा निवडणुकीत विजयी झालेल्या सोनिया सिद्धूंचा प्रचार
बातम्या आणखी आहेत...