आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parrikar Says India Can Defend Itself On Modi Sharif Meeting Eve

भारत स्वतःचे संरक्षण करण्यास समर्थ, पाकच्या बडबडीला संरक्षण मंत्र्यांचे प्रत्युत्तर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या भेटीच्या पूर्वसंध्येला भारताचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी पाकला प्रत्युत्तर दिले आहे. भारत स्वतःचे संरक्षण करायला समर्थ असल्याचे पर्रिकर यांनी ठासून सांगितले. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तान गरज पडल्यास अण्वस्राचा वापर करू शकतो असा, धमकीवजा इशारा दिला होता. त्याला प्रत्युत्तर देताना पर्रिकर यांनी हे वक्तव्य केले आहे.

ख्वाजा यांच्या इशाऱ्यावर प्रतिक्रिया विचारली असता पर्रिकर म्हणाले की, प्रत्येक विषयावर प्रतिक्रिया देण्याची गरजच नाही. मी भारताचा संरक्षण मंत्री आहे आणि भारत स्वतःचे रक्षण करण्यास समर्थ आहे, अशा शब्दांत त्यांनी आपले मत मांडले. चीनने लखवीच्या मुद्यावर दिलेल्या प्रतिक्रियेबाबत पर्रिकरांनी बोलणे टाळले. हा मुद्दा परराष्ट्र मंत्रालयाशी संबंधित असल्याने याबाबत बोलण्यास त्यांनी नकार दिला.