आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Parrikar Says Martyrdom Is Great It Doesnot Mean You Get Killed When You Go Fighting

हौतात्म्य एक महान कार्य, पण शत्रूंशी लढताना आपला जीव देणे आवश्यक नाही; मनोहर पर्रिकर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी - हौतात्म्य एक महान कार्य असले तरीही त्याचा अर्थ शत्रूंशी लढताना जीव द्यावा असा होत नाही. लढताना जीव देणे आवश्यक नसल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी रविवारी म्हटले आहे. देशासाठी शहीद होणे आवश्यक नाही, त्यापेक्षा लढताना शत्रूंचाच जीव घ्यायला हवा असेही ते पुढे म्हणाले आहेत. 
 
> वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गोव्याचे मुख्यमंत्री पर्रिकर एका मॅराथॉनमध्ये बोलत होते. "कमीत-कमी लोकांचा जीव जावा यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील होतो."
> "मी जवानांना आधीच म्हटले आहे, की स्वतः शहीद होण्यापेक्षा शत्रूंनाच मारा."
> "देशासाठी सर्व काही अर्पण करणे चांगली गोष्ट आहे. याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही देशासाठी मरावे. आपला हेतू शत्रूंना ठार मारणे असा आहे."
> "निश्चितच, जवान आपल्या सीमेच्या संरक्षणासाठी जे काही करतात ते कधीच विसरता येणार नाही." असेही पर्रिकर यांनी स्पष्ट केले आहे.
 
बातम्या आणखी आहेत...