आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुडघा रोपण केलेल्या 80 वयापर्यंतच्या 300 जणांचा गरब्यात सहभाग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- अहमदाबाद शहरात  ४५ ते ८० वयापर्यंतच्या ३०० जणांचा गरब्यातील सहभाग चर्चेचा विषय ठरला आहे. या सर्वांवर कधी ना कधी गुडघा रोपणाची शस्त्रक्रिया झालेली आहे हे विशेष. काहींवर महिनाभरापूर्वी तर काहींची शस्त्रक्रिया होऊन ९ वर्षे झाली. 

गुडघा रोपणानंतर माणसाच्या पायांची क्षमता व हालचालीवर नियंत्रण येत असल्याचे म्हटले जाते. हा गैरसमज मोडून काढण्यासाठी आणि गुडघा रोपणाच्या रुग्णांना मानसिक व शारीरिकदृष्ट्या सकारात्मक संदेश देण्यासाठी हे सर्व जण एकत्र आले होते. त्यांनी मोठ्या उत्साहात गरबा खेळून दुर्बलता आयुष्य जगण्याच्या उत्साहात अडथळा ठरू शकत नाही, असा संदेश दिला.  

गुरुवारी शरद पौर्णिमेनिमित्त याचे आयोजन केले होते. नी- रिप्लेसमेंट सर्जन डॉ. सौरिन शहा यासंदर्भात म्हणाले, शस्त्रक्रियेनंतर शारीरिक हालचालीत सक्रिय राहिल्यास रुग्णांना सक्षम ठेवण्यात मदत मिळते. लोकांच्या मनातून रोपणाशी संबंधित चुकीचे समज दूर करून शस्त्रक्रियेनंतरही सामान्य जीवन जगता येते हा संदेश देणे हा या गरब्यामागचा उद्देश होता. यासाठी जागरूकतेची आवश्यकता आहे. गरब्याशिवाय ‘वार्धक्यात लहानपणाचा आनंद’ या थीमवर लिंबू-चमचा, संगीत खुर्ची असे खेळ खेळले.  
 
गेल्या काही वर्षांपासून गरबा परंपरेसोबत फिटनेस ट्रेंडही समाविष्ट झाला आहे. हा एक चांगला व्यायाम असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एका तासाच्या गरब्यात ५००-६०० कॅलरी जळतात. गरब्याचा तब्येतीशी संबंध जोडण्यासाठी ‘जुम्बा गरबा’ रुढ होत आहे. आता गुडघा रोपणानंतर फिटनेसचा संदेश देणारा गरबा याचाच भाग बनला आहे.
बातम्या आणखी आहेत...