आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुप्तांग कापून कुरिअर करणाऱ्या युवतीने म्हटले, 13 वर्षांपासून सुरु होते अत्याचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कानपूर - कानपूरमधील एका गावातील विश्रामगृहात काही दिवसांपूर्वी एका डॉक्टरची हत्या करण्यात आली होती आणि त्याचे गुप्तांग कापून त्याच्या पत्नीला कुरिअर करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी एका युवतीला अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार तिने हत्येची कबुली दिली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणीवर ती 13 वर्षांची असतानापासून डॉक्टर तिच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचर करीत होता. त्याने तिच्या बहिणीवरही वाईट नजर टाकल्याने तिने त्याची हत्या केली.

एम.ए., बी.एड असे उच्च शिक्षण घेतलेल्या नीलूने (नाव बदलले आहे) सांगितले, की डॉक्टरच्या शारीरिक आणि मानसिक अत्याचाराला वैतागून त्याची हत्या केली आणि त्यानंतर त्याचे गुप्तांग कापून त्याच्या पत्नीला कुरिअर केले. तसेच ज्या ठिकाणी हत्या केली तेथील भिंतीवर लिहिले, 'मानवाने निसर्गाच्या विरोधात काम केले तर निसर्ग त्याला त्याची शिक्षा देतो.' तिचा आरोप आहे की, डॉक्टरच्या पत्नीलाही त्याचे इतर महिलांसोबत संबंध असल्याची माहिती होती. तसेच त्याच्या परिवारातील इतर महिलांसोबतही त्याचे संबंध होते.

अमरोधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी असलेले सतीश चंद्रा नीलूचे वडील आजारी असल्यामुळे तिच्या घरी गेले होते. तेव्हापासून ते तिचे लैंगिक शोषण करीत होते. असा आरोप तिने केला आहे. डॉक्टर चंद्रा यांनी तिच्या बहिणीलाही सोडले नव्हते असेही तिने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर तिला बेशुध्द करुन तिच्यावर अत्याचार करीत असे. त्यामुळे तिनेही डॉक्टरला प्रथम बेशुद्ध केले. त्यानंतर त्याचे हात-पाय बांधून सर्जीकल नाइफने त्याचा गळा कापला आणि नतंर त्याचे गुप्तांग कापून त्याच्या पत्नीला कुरिअर केले. युवतीने डॉक्टरला वोडकामधून बेशुद्धीचे औषध दिले होते.