आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Party Will Not Celebrate After Win In Jammu Election

जम्मू-काश्मीरमध्ये विजयी मिरवणूक रद्द, पेशावरच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी होत आहे. सायंकाळपर्यंत सर्व निकाल हाती येतील तेव्हा कोणत्याही राजकीय पक्षाला विजयी मिरवणूक काढता येणार नाही. राज्य प्रशासनाने तसे आदेश काढले आहेत.
राज्यात आलेला महापूर आणि गेल्या मंगळवारी पेशावरमध्ये झालेल्या शालेय मुलांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर विजयी मिरवणुका काढू नयेत, असे प्रशासनाने म्हटले आहे. तसे आवाहनही राजकीय पक्षांना करण्यात आले होते. यावर सर्वच राजकीय पक्षांनी सहमती दर्शवली असून राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत नेत्यांशी प्रत्यक्ष चर्चाही केली आहे. महापुराच्या तडाख्यातून अजूनही काश्मीर खोरे सावरलेले नाही. येथील लोकांच्या समस्या अजून सुटलेल्या नाहीत. याच काळात पेशावरमध्ये अमानुषपणे शाळकरी मुलांच्या तालिबानी अतिरेक्यांनी केलेल्या हत्येची घटना ताजी असताना विजयी िमरवणुका काढल्या जाऊ नयेत, असे आवाहन या जिल्हाधिकाऱ्यांनी केल्यानंतर सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी याला सहमती दर्शवली.