आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शताब्दी एक्स्प्रेसमध्ये सफोकेशन, श्वास घेण्यासाठी प्रवाशांनी तोडली खिडकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हावडा (पश्चिम बंगाल)- न्यु जयपाईगुडी येथून 12042 शताब्दी एक्स्प्रेस हावड्याला जात असताना प्रवाशांना सफोकेशनचा त्रास जाणवू लागला. त्यांनी रेल्वे प्रशासनाला याची तक्रार दिली. पण प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. अखेर प्रवाशांनी श्वास घेण्यासाठी खिडकीची काच तोडली. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये अस्वच्छा दिसली तर ती दूर करण्यासाठी एक अॅप सादर केले जाईल असे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी जाहीर केल्यानंतर अगदी काहीच दिवसांत हा प्रकार घडला आहे. शिवाय तक्रार देऊनही प्रशासनाने काही कारवाई केली नाही.
प्रवाशांनी केले आरोप

प्रवासात लागलेल्या बोलपूर स्टेशनवर आम्ही रेल्वे अटेंडंटला याची तक्रार केला. पण त्याने काही ऐकून घेतले नाही असा आरोप प्रवाशांनी केला आहे. एका प्रवाशाने सांगितले, की न्यु जलपाईगुडीमध्ये हवामान खराब होते. ट्रेन सुरु झाली तेव्हापासून एसीत प्रॉब्लेम सुरु झाला. आम्ही याची तक्रार एसी अटेंडंटला केली. त्याने सांगितले, की जरा वेळात प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. यावेळी डब्यात अनेक महिला आणि मुले होते. सफोकेशनमुळे त्यांना श्वास घेणेही अवघड जाऊ लागले. डब्यात पंखे होते. पण फारच स्लो हवा फेकत होते. सुरवातीला आम्ही डब्याची दारे उघडी ठेवण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतरही श्वास घेणे अवघड होत होते.
तक्रारीवर काहीच कारवाई नाही
तक्रार केल्यावर बोलपूर स्टेशनवर काही मॅकॅनिक आले. पण त्यांना एसी ठिक करता आला नाही. त्यानंतर जराच वेळात डब्यातील परिस्थिती खराब झाली. त्यामुळे आम्ही खिडकीची काच तोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बाहेरचा कचरा आत येऊ लागला. पण सफोकेशनची समस्या सोडविता आली. रेल्वेने या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे.
बातम्या आणखी आहेत...