आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असा दिसतो 200 वर्षांचे पतौडी पॅलेस, वडील 9 वे तर सैफ अली खान आहे 10 वा नवाब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पतोडी पॅलेस आणि नवाब मंसूर अली खान पतोडी. - Divya Marathi
पतोडी पॅलेस आणि नवाब मंसूर अली खान पतोडी.
गुडगाव - 200 वर्ष पूरातन पतौडी रियासतचे नववे नवाब मंसूर अली खान पतोडी यांचा जन्म 5 जानेवारी 1941 मध्ये भोपाळला झाला होता आणि त्यांचे निधन 22 सप्टेंबर 2011 रोजी दिल्लीत झाले. नवाब अली खान हरियाणामधील गुडगावपासून 26 किलोमीटरवर अरावली डोंगरावर पतौडी पॅलेसमध्ये राहात होते, तिथे 150 त्यांच्या देखभालीसाठी 100 नोकर आहेत.
सैफ अली खान 10 वा नवाब
मंसूर अली खान पतौडी संस्थानचे 9 वे नवाब होते तर त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा सैफ अली खान येथील 10 वा नवाब झाला. पतौडी संस्थानची स्थापना 1804 मध्ये झाली, याचे पहिले नवाब होते फैज तलब खान.
मुगलांकडून बक्षिसात मिळाली होती दिल्ली आणि राजस्थानमधील जमीन
सैफ अली खानचे पूर्वज सलामत खान 1408 मध्ये अफगाणिस्तानातून भारतात आले होते. सलामत यांचे नातू अल्फ खान यांनी कित्येक लढायांमध्ये मुगलांना साथ दिली होती. त्याची बक्षिसी म्हणून अल्फ खान यांना राजस्थान आणि दिल्लीमध्ये जमीन देण्यात आली होती. 1917 ते 1952 मध्ये इफ्तिखार अली हुसैन सिद्दीकी हे पतौडी संस्थानचे आठवे नवाब होते. इफ्तिखार अली क्रिकेटचे चाहते आणि चांगले क्रिकेटर देखिल होते. सुरुवातीला ते इंग्लंड टीमकडून खेळत होते नंतर ते भारतीय संघाचे कर्णधार झाले.
इफ्तिखार यांच्या मृत्यूनंतर पतौडी संस्थानचे 9 वे नवाब त्यांचा मुलगा मंसूर अली उर्फ टायगर झाले. ते भारतीय क्रिकेटचे कर्णधार देखील होते. सप्टेंबर 2011 मध्ये फुफ्फुसाच्या आजाराने त्यांचे निधन झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर टायगर पतौडी आणि शर्मिला टागोर यांचे चिरंजिव सैफ अली खान 10 वे नवाब झाले.
महाल परिसरताच कबर
नवाब परिवाराचा पतौडी पॅलेस नावाने महाल आहे. मंसूर अली उर्फ नवाब पतौडी यांच्या मृत्यूनंतर त्यांचा दफनविधी महाल परिसरातच करण्यात आला. त्यांच्या इतर पुर्वजांची कबर देखिल येथेच आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, आतून किती लक्झरियस आहे पतौडी पॅलेस
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...