आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pathankot Attack Gurdaspur SP Salwinder Singh Likely To Face Polygraph Test

पठाणकोट; माजी एसपी सलविंदरसिंग संकटात, होऊ शकते पॉलिग्राफी टेस्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरदासपूरचे माजी एसपी सलविंदरसिंग (फाइल फोटो) - Divya Marathi
गुरदासपूरचे माजी एसपी सलविंदरसिंग (फाइल फोटो)
पठाणकोट - राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) गुरदासपूरचे माजी एसपी सलविंदरसिंग यांची पॉलिग्राफ टेस्ट करण्याचे निश्चित केले आहे. सलिवंदर यांनी म्हटले होते की पठाणकोट एअरबेसवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण केले होते.

का होणार पॉलिग्राफी टेस्ट
- एनआयए अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सलविंदरसिंग यांची पॉलिग्राफी टेस्ट बंगळुरुला होण्याची शक्यता आहे.
- वास्तविक गुरुवारी सायंकाळपर्यंत सलविंदरसिंग यांनी या टेस्टला होकार दिला नव्हता.
- सलविंदर यांच्या जबाबामुळे त्यांच्यावरील संशय वाढला आहे.
- तलूर गावातील धार्मिकस्थळी जाण्याची आणि तेथून परतण्याची वेळ त्यांनी वारंवार बदलली आहे.

काय म्हणाले होते सलविंदर
- मी पठाणकोट येथील धार्मिक स्थळी नेहमी जात असतो.
- धार्मिक स्थळावरुन परतताना दहशतवाद्यांनी माझे अपहरण केले.
- दुसरीकडे धार्मिक स्थळाचे केअरटेकर सोमराज यांचे म्हणणे आहे की 31 डिसेंबर रोजी त्यांनी प्रथमच सलविंदर यांना पाहिले होते.

या प्रश्नांमुळे संशय बळावला
- सलविंदर यांनी 27 किलोमीटरचा सरळ मार्ग सोडून 55 किलोमीटर अंतर असलेला कठुआ येथून जाणारा मार्ग का निवडला ? सलविंदर यांचे लॉजिक आहे की तो रस्ता खराब होता, मग परत येताना त्याच मार्गाने का आले नाही ?
- धार्मिक स्थळाच्या सेवादारने खोटे सांगितले. ते म्हणाले, सलविंदर रात्री 9 वाजता आले. टोल नाक्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा त्यांची गाडी 10.17 वाजता गेली होती.
- कोलियांकडे येत असताना सलविंदर यांचा मित्र राजेश वर्माने दहशतवाद्यांना ड्रग्ज तस्कर समजून गाडी थांबवली होती का ? ड्रग्ज तस्करांच्या सांगण्यावरुनच दहशतवाद्यांनी सलविंदर यांना काही इजा केली नाही का ?
- अखेर एवढ्या रात्री सलविंदर यांनी बॉर्डर भागात जाताना आपला एखादा गनमॅन सोबत का घेतला नाही ?
- सलविंदर यांच्या गाडीत एखादा वायरलेस फोन नव्हता का ? जर ते त्यांच्या खासगी गाडीने चालले होते तर मग त्यांनी गाडीवर निळा दिवा का लावला होता ? त्यांची त्यांनी कोणाला माहिती दिली होती का ?
सलविंदर यांची '3 तासांची मिस्ट्री'
- सलविंदर रात्री 9 वाजता धार्मिक स्थळाहून निघाले आणि रात्री 11.30 ते 12 वाजता दरम्यान त्यांचे अपहरण झाले.
- ज्या ठिकाणी अपहरण झाले ते ठिकाण धार्मिक स्थळापासून 13 किलोमीटरवर आहे.
- मग प्रश्न उपस्थित होतो की एवढे अंतर कापायला त्यांना तीन तास का लागले ? या दरम्यान ते कुठे होते ?
NIA ने माजी एसपींना नेले धार्मिक स्थळी
- NIA च्या टीमने सलविंदर यांना अजून अटक केलेली नाही.
- मंगळवारी रात्री त्यांची चार तास चौकशी करण्यात आली.
- बुधवारी सायंकाळी NIA टीम माजी एसपी सलविंदरसिंग यांना घटनास्थळी (बमियाल गाव) घेऊन गेली. येथेच सलविंदर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अपहरण झाले होते.
- सलविंदरसिंग यांना पंज पीर दर्ग्यात देखिल नेण्यात आले होते.

त्यांनी दहशतवाद्यांची मदत केली होती का ?
- माजी एसपी सलविंदरसिंग यांना अजून अटक करण्यात आलेली नाही, मात्र त्यांच्या भोवती संशयाचे वातावरण वाढले आहे.
- त्यांनी दहशतवाद्यांना एअरबेसपर्यंत पोहोचवण्यात मदत केली होती का, या दीशेनेही तपास सुरु आहे.
- असाही प्रश्न निर्माण होत आहे, की या भागात दहशतवादी अलर्ट जारी झाला होता, असे असताना सलविंदर शस्त्राशिवाय या भागात कसे गेले होते?
- एसपींच्या कारला चेक पॉइंटवर का नाही थांबवले गेले ?

ट्रॅक रेकॉर्ड खराब
- पाच महिला कॉन्स्टेबल्सनी पोलिस महासंचालाकांकडे सलविंदर सिंग यांची तक्रार केली होती. महिला पोलिसांवर ते अभद्र कॉमेंट करतात, असा त्यांचा आरोप होता. या प्रकरणाचा तपास पोलिस महानिरीक्षक गुरप्रीत कौर देव यांच्याकडे देण्यात आला होता.
- सूत्रांच्या माहितीनुसार, दहशतवादी हल्ल्याआधी सलविंदर यांनी आयजी गुरप्रीत कौर यांच्या कार्यालयाला भेट दिली होती. त्यांना बोलावले नसताना ते आयजीच्या कार्यालयात आले होते.
- अपहरणाच्या आधी सलविंदर यांची बदली जालंधर येथे असिस्टंट कमांडर म्हणून झाली होती, मात्र ते तिथे रुजू झाले नाही.