आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pathankot Attack: Phone Number Of Handlers Revealed

आपलेच फितूर, एअरबेसच्या लाइट्सची दिशा बदलणारा तंत्रज्ञ ताब्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एअरबेसवर पाहारा देताना आर्मीचे जवान. - Divya Marathi
एअरबेसवर पाहारा देताना आर्मीचे जवान.
पठाणकोट - गेल्या आठवड्यात शनिवारी झालेल्या एअरबेसवरील दहशतवादी हल्ल्याआधी हवाई दलाच्या तळावरील फ्लडलाइट्सची दीशा बदलण्यात आली असल्याचे समोर आले आहे. ही गडबड लक्षात आल्यानंतर लष्कराच्या एका टेक्निशियनला ताब्यात घेण्यात आले आहे. दुसरीकडे, दहशतवाद्यांनी पाकिस्तानच्या ज्या क्रमांकांवर फोन केला होता त्यांचा देखिल खुलासा झाला आहे. एक क्रमांक दहशतवाद्याच्या आईचा आहे, तर दुसरा हँडलर 'उस्ताद'चा आहे.

कोणाला केली अटक
- इंग्रजी दैनिक इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, मिलिटरी अँड इंजिनिअरिंग सर्व्हिस (एमईएस)च्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला एनआयएने ताब्यात घेतले आहे.
- त्याच्यावर आरोप आहे, की त्याने दहशतवादी एअरबेसमध्ये घुसण्याआधी तेथील फ्लडलाइट्सची दीशा बदलली होती. लाइट्स वरच्या बाजूला करण्यात आले होते.
- असे यासाठी करण्यात आले, कारण लाइट्स वरच्या बाजूला करण्यात आल्यामुळे ग्राऊंडवर अंधार पडेल आणि दहशतवाद्यांना सहज आत घुसता यावे.
- जिथे हे फ्लडलाइट्स लावण्यात आले आहेत, तिथे एक टोपी आणि ग्लोज सापडले आहे.
दहशतवाद्यांनी पाकिस्तानच्या कोणत्या क्रमांकावर केले होते फोन... कोण आहे 'उस्ताद'
- पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, पठाणकोट एअरबेसवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे चार हँडलर्स बहावलपूर येथे होते.
- जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर, त्याचा भाऊ अब्दुल रऊफ असगर, तसेच अश्फाक आणि काशीम हेच पठाणकोट हल्ल्यामागील हँडलर आहेत.
- मसूद हा तोच दहशतवादी आहे, ज्याला 1999 मध्ये विमान अपहरणानंतर कंधारला नेऊन सोडण्यात आले होते.
- एका इंग्रजी दैनिकातील वृत्तानुसार, दहशतवाद्यांनी भारतात घुसल्यानंतर पाकिस्तानात ज्या क्रमांकावर फोन केले होते ते 92-3017775253 आणि 92-300097212 हे दोन क्रमांक आहेत.
- दहशतवाद्यांनी त्यांचा 'उस्ताद' आणि आईला फोन केला होता. हे फोन भारतात घुसल्यानंतर अपहरण केलेल्या लोकांच्या फोनवरुन करण्यात आले होते.

काय झाले होते बोलणे ?
- +92 300097212 या क्रमांकावर 31 डिसेंबरच्या रात्री 9.12 वाजता फोन करण्यात आला होता.
- दहशतवाद्यांनी अपहरण करुन मारण्यात आलेला टॅक्सी ड्रायव्हर एकाग्रसिंहचा हा फोन होता.
- ड्रायव्हरच्या फोनवरुन पाकिस्तानात एक आऊटगोईंग कॉल आहे, तर त्याच क्रमांकावरुन चार कॉल रिसिव्ह करण्यात आले. हे चारही कॉल पाकिस्तानातून आले होते.
- दहशतवाद्यांनी एकाग्रच्या फोनवरुन हँडलर्सला एक मिस्ड कॉल देखिल दिला होता.
शेवटचा कॉल राजेशच्या फोनवरुन
- सहापैकी एका दहशतवाद्याने शेवटचा कॉल त्याच्या आईला केला होता. त्यासाठी त्याने ज्वेलर राजेश वर्मांचा फोन घेतला होता. अपहरण करण्यात आलेले गुरदासपूरचे माजी एसपी सालविंदरसिंग यांच्यासोबत त्यांचा मित्र राजेश वर्माचेही अपहरण करण्यात आले होते.
- हा कॉल 1 जानेवारीला सकाळी 8.30 वाजता करण्यात आला होता. त्यानंतर दहशतवाद्यांनी एअरबेसवर हल्ला केला.
- अशी माहिती आहे, की फोनवर दहशतवाद्याने आईला सांगितले, की मी भारतात आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, दहशतवाद्यांकडे सापडलेले पेनकिलर