आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pathankot Terror Attack 5 Terrorists Killed In Gunbattle

पठाणकोट एअरबेसवरील दहशतवादी हल्ल्यातील प्रत्येक क्षण...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पठाणकोट - पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ डिसेंबरला अचानक लाहोरला जाऊन आले. यास आठवडा उलटत नाही तोच पाकिस्तानी दहशतवाद्यांनी त्याचे रिटर्न गिफ्ट दिले. शनिवारी पहाटे ३.३०च्या सुमारास "जैश-ए-मोहंमद'च्या दहशतवाद्यांनी लष्करी वेशात पठाणकोट हवाई तळावर हल्ला चढवला. दरम्यान, वायुसेनेचे दोन लढाऊ हेलिकॉप्टर आणि सुरक्षा दलाच्या मदतीने शनिवारी सायंकाळपर्यंत पाचव्या अतिरेक्यास ठार केल्याची माहिती मिळाली. या मोहिमेत वायुसेनेने धाडसी कामगिरी बजावत पठाणकोट हवाई तळ परिसरातील १० किमी परिसराला घेराव घातला. यासाठी १० हजार जवान तैनात होते. २६/११ नंतर झालेला हा दुसरा मोठा हल्ला मानला जात आहे.

हल्ल्यातील प्रत्येक क्षण...
कसा झाला हल्ला?
- शनिवारी पहाटे ३.३० वा. लष्कराच्या गणवेशात अतिरेकी मागच्या बाजूने पठाणकोट हवाई तळात दाखल झाले.
- मिग-२१ विमान आणि संवेदनशील क्षेत्रात घुसखोरी करण्याचा त्यांचा मानस होता. सुरक्षा दलाने तो हाणून पाडला.
- हवाई तळातील इमारतीत घुसून लाइट मशीनगनच्या साहाय्याने अतिरेक्यांनी गोळीबार केला. प्रत्युत्तरात सहा जवान शहीद झाले.

जवानांचे चोख प्रत्युत्तर
- पहाटे ४.४५ वा. सुरक्षा दलाने एका अतिरेक्याला ठार केले. पहाटे ५.३५ ला दुसरा मारला गेला.
- ५.३० वा. एनएसजीला पाचारण करण्यात आले. वायुसेना आणि लष्कराची हेलिकॉप्टर्सही सज्ज. अतिरेक्यांना जागीच घेरण्यात आले.
- संपूर्ण अभियानात १० हजार सुरक्षा जवान तैनात केले. सुमारे १७ तास चाललेल्या धुमश्चक्रीनंतर ५ अतिरेक्यांना ठार करण्यात आले.

अतिरेक्याची आई म्हणाली, मरण्यापूर्वी जेवून घेशील?
गुप्तचर संस्थेने दहशतवाद्यांनी पाकिस्तानमध्ये केलेले कॉल ट्रेस केले आहेत. त्यांनी ३ ते ४ वेळा पाकमध्ये फोन केले. पठाणकोटमध्ये टॅक्सी बुक करण्यासाठीही अतिरेक्यांनी पाकिस्तानी नंबरच वापरले होते. दरम्यान, अतिरेक्याने त्याच्या आईशी साधलेला संवाद ट्रेस झाला आहे. अतिरेकी आईला म्हणाला, मी आत्मघाती अभियानावर आहे. त्यावर आईने "बाळ, मरण्यापूर्वी जेवून घेशील' असे उत्तर दिल्याचे रेकॉर्ड उपलब्ध झाले आहे. हल्ल्यावेळी अतिरेकी पाकमधील त्यांच्या मास्टरमाइंडशी सतत संवाद साधत होते. हल्ल्यापूर्वी आयएसआयने या अतिरेक्यांची बैठकही घेतल्याचे वृत्त आहे.

पुढे वाचा, दुसऱ्यांदा घुसखोरीसाठीही पहाडीपूर भागच निवडला...