आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#Pathankot: काँग्रेसचा सवाल- कोणत्या भरवशावर PAK मध्ये गेले होते PM

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलग चार दिवसांपासून जवान एअरबेसवर मोर्चा सांभाळत आहेत. - Divya Marathi
सलग चार दिवसांपासून जवान एअरबेसवर मोर्चा सांभाळत आहेत.
पठाणकोट - एअरबेसवरील हल्ल्याच्या चौथ्या दिवशीही पठाणकोटमध्येही ऑपरेशन सुरु आहे. एअरफोर्स, आर्मी आणि एनएसजी कमांडो सध्या बेसवर कॉम्बिंग ऑपरेशन करत आहे. शनिवारी पहाटे हवाई दलाच्या तळावर दहशतवादी हल्ला झाला होता. सोमवारी सायंकाळपर्यंत पाच दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. या कारवाईत आमचे 7 जवान शहीद झाले. केंद्रीय संरक्षण मंत्री आज दुपारी दोन वाजता एअरबेसवर पत्रकार परिषद घेणार आहेत. दरम्यान, काँग्रेसने हा हल्ला हवाई दल तळावर नसून देशावर झाल्याचे म्हटले आहे.

मंगळवारचे अपडेट्स
काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर तोफ डागली. शर्मांनी पंतप्रधान मोदींच्या अचानक पाक दौऱ्यावर प्रश्न उपस्थित करत म्हटले, 'पंतप्रधानांना पाकिस्तानने कोणता भरवसा दिला होता, ज्या आधारावर ते पाकिस्तानात गेले होते? त्यांनी हे देशाला सांगितले पाहिजे.'
- काँग्रेसने हा हल्ला एअरबेसवर नाही तर देशावर झाल्याचे म्हटले आहे.
- संरक्षण मंत्री आणि तिन्ही दलांचे प्रमुख आज दुपारी पठाणकोटला जाण्याची शक्यता आहे.
- सोमवार सायंकाळनंतर एअरबेसमध्ये कुठेही फायरिंग झालेली नाही.

...जवळ जाताच त्याने केली फायरिंग
- सोमवारी सकाळपासून एनएसजी टीमने दुमजली इमारतीला वेढा टाकला होता, याच इमारतीत दोन दहशतवादी दडून बसले होते.
- जवळपास तीन वाजता बिल्डिंगला स्फोटांनी उडवण्यात आले. या दरम्यान एक दहशतवादी ठार झाला आणि त्याचे शरीर देखील स्फोटात जळाले.
- एनएसजी टीमला वाटले दोन्ही दहशतवादी मारले गेले.
- त्यानंतर दिल्लीहून आलेली एनआयए टीमला दहशतवाद्यांचे मृतदेह पडलेल्या ठिकाणी नेण्यात आले.
- त्याचवेळी एक गोळी टीम आणि पंजाब पोलिस अधिकाऱ्यांच्या दिशेने आली मात्र दहशतवद्याचा निशाणा चुकला.
- त्यानंतर सर्व अधिकाऱ्यांना तिथून पळ काढावा लागला.
- तो दहशतवादी एअरफोर्सच्या आतील जंगलात लपलेला होता.