आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pathankot Terror Attack: Special Search Mission At Gurudaspur

पठाणकोटनंतर...संशयितांची धरपकड करण्यासाठी खास शोधमोहीम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरूदासपूर- पंजाबमधील सरहद्दीवरील गावात लष्कराची गस्त आणि शोधमोहिम अलीकडे गावकऱ्यांसाठी रोजची झाली आहे. तिबरी कान्ट गाव परिसरात संशयित दडून बसल्याची वार्ता मिळताच गुरूवारी लष्कराने तातडीने त्या दिशेने कूच केली. ही शोध मोहिम सायंकाळपर्यंत सुरू होती.

हाय अलर्ट
काही गावकऱ्यांनी संशयित दहशतवादी लपल्याचे पाहिले, असा दावा केल्यानंतर माेहिम सुरू झाली. रात्रीपर्यंत कोणीही सापडले नसले तरी परिसर लष्कराच्या निगराणीखाली आहे. परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. आता कोणतीही चूक परवडणारी नसल्याने अतिदक्षता घेण्यात येत आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, जुलैमध्ये केले होते लक्ष्य...