(फोटो: पटियालाचे महाराज भूपेंद्र सिंह)
पटियाला/चंदीगड - विदेशी बँकांमध्ये ज्या भारतीयांची खाती आहेत अशा लोकांची यादी सुप्रीम कोर्टाला देण्यात आली आहे. या यादीत युपीए सरकारमधील परराष्ट्र राज्य मंत्री असलेल्या परनीत कौर यांच्या नावाचा समावेश आहे. कौर पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेमधील काँग्रेसचे उपनेता अमरिंदर सिंह यांच्या पत्नी आहेत. तसेच पटियालाच्या राजघराण्याच्या त्या सुनही आहेत. हे तेच राज घराणे आहे ज्यांचे महाराज भूपेंद्र सिंह यांनी जगप्रसिध्द कार रोल्स रॉईसला कचर्याची गाडी बनवले होते.
इंग्रजी वृत्तपत्र द टाईम्स ऑफ इंडियाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वित्झरलँडमध्ये असलेल्या एचएसबीसीच्या मुख्य शाखेत परनीत कौर यांचे कोणतेही खाते नाही आहे, मात्र एचएसबीसीच्या यादीनुसार परनीत कौर यांचे एक अकाऊंट 10 वर्षांपूर्वीचे होते. सुत्रांनी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार या अकाऊंटमध्ये काहीच पैसे नाहीत. तर सर्वात जास्त पैसा डाबर ग्रूपचे प्रदीप बर्मन यांचा असून ही रक्कम 50 कोटी रुपये एवढी आहे.
का बनवले होते रोल्स रॉईसला कचर्याची गाडी
महाराजा ऑफ पटियाला भूपेंद्र सिंह हे रोल्स रॉईसच्या शोरूमध्ये हायअँड मॉडेलबद्दल माहिती घेण्यासाठी गेले होते. तेव्हा शोरुमच्या सेल्समन त्यांना म्हणाला की, ही कार घेण्याची तुमची ऐपत नाही. तेव्हा रागात असलेल्या भूपेंद्र सिंह यांनी शोरुम मधील सर्व कार विकत घेतल्या होत्या आणि त्यांचे छत काढून त्यांना कचर्याची गाडी बनवले होते.
पुढील स्लाईडवर पाहा, भूपेंद्र सिंह यांचे रॉल्स रॉईससोबतचे फोटो...