आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Patna Blackmail School Girl With Nude Mms Police Arrested Culprit News In Marathi

पाटण्यात प्रियकराचा प्रेयसीवर बलात्कार, Whatsapp वर शेअर केला VIDEO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: पीडित तरुणी)
पाटणा- अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर बलात्कार करून अश्लील व्हिडिओ बनवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढेच नव्हे तर प्रियकाराने पीडितेचा अश्लील व्हिडिओ मित्रांना वॉट्‍सअॅपवर शेअर केला. बिहारमधील दानापूर जिल्ह्यातील खगौल येथे ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी प्रियकर रोहीत कुमारसह एकाला अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आरोपी रोहीत कुमार हा खाणावळ चालवतो. पीडिता ही इयत्ता 10वीची विद्यार्थिनी आहे. रोहीतने पीडितेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि काही दिवसांतच तिला विश्वासात घेऊन तिच्यावर बलात्कार करून मोबाइल कॅमेर्‍यात अश्लील व्हिडिओ बनवला. एवढेच नव्हे तर तो मित्राला वॉट्‍सअॅपवर शेअर केला.

आमच्यासोबत शारीरिक संबंध ठेव, नाही तर तुझी बदनामी करू रोहित आणि त्याचे मित्र पीडितेला फोन करून वारंवार ब्लॅकमेल करू लागले. नराधमांच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने आरोपीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन आरोपी रोहित कुमारसह त्याचा सुधीरला अटक केले आहे. अन्य चार आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, रेल्वेचे रिकामे गेस्ट हाऊस बनले मौज-मस्तीचे ठिकाण ...