आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Patna Motihari Accident Unmanned Railway Crossing Train Hit Auto

राप्ती-गंगा एक्स्प्रेसची रिक्षाला भीषण धडक, दोन कुटूंबातील 18 जणांचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- बिहारमधील मोतीहारी ज‍िल्ह्या‍त सोमवारी (18 ऑगस्ट) राप्ती-गंगा एक्स्प्रेसने रिक्षाला जबरदस्त धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन कुटूंबातील 18 जणांचा मृत्यू झाला. सेमरा-सुगौली रेल्वे मार्गावर हा अपघात झाला. नव्या रिक्षाची पूजा करून हे सगळे घरी परत येत होती. गेटमन दारूच्या नशेत होता. त्यामुळे त्याने गेट उघडेच ठेवल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
रेल्वे इंजिनमध्ये फसला रिक्षा...
मोतिहारीमधील सेमरा-सुगौली रेल्वे मार्गावरील रेल्वे गेट बंद नसल्यामुळे रिक्षा रेल्वे रुळ ओलांडत असताना अचानक मुझफ्फरपूरहून देहरादून जाणारी राप्ती-गंगा एक्स्प्रेसने रिक्षाला जोरात धडक दिली. रिक्षा चक्काचूर झाला. रिक्षात बसलेले 18 जणांचा घटनास्थळी ‍मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरु केले असून रिक्षात अडकलेले मृतदेह बाहेर काढले.

रेल्वे प्रशासनाने दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना 50-50 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे राज्‍य सरकारनेही मृतांच्या कुटूंबियांना दीड-दीड लाख रुपये मदत जाहीर केली आहे. याशिवाय जखमींना पाच- पाच हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे.

(फोटो: रेल्वे इंजिनमध्ये फसलेला रिक्षा)