आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीएनए वक्तव्यावर नितीश यांची टीका, ५० लाख नमुने पाठवणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बिहारी डीएनए वक्तव्यावर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी प्रखर टीका केली आहे. सोमवारी ट्विटरद्वारे नितीश यांनी आपला राग व्यक्त केला. बिहारमधून ५० लाख नागरिकांचे नखे व केसांचे नमुने पंतप्रधानांना पाठवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

हे नमुने त्यांनी नीट तपासावेत. या नमुन्यांसोबत प्रत्येक व्यक्तीची स्वाक्षरीही पाठवली जाईल, असे नितीश म्हणाले. यासाठी बिहारमध्ये स्वाक्षरी अभियान राबविले जाईल. पंतप्रधानांनी हे वक्तव्य मागे घ्यावे, या मागणीसाठी स्वाक्षरी अभियान राबवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वक्तव्याद्वारे पंतप्रधानांनी बिहारी जनतेचा अपमान केला आहे.