आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Patna Sp Shivdeep Lande In Controversy Over Inspectors Arrest

मराठमोळा एसपी शिवदीप लांडे चौकशीच्या फेर्‍यात; बघा, खाकी वर्दी ते चुनरीपर्यंतची विविध रुपे!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- मराठमोळा पोलिस इन्स्पेक्टर शिवदीप लांडे हे आपल्या हटके स्टाइलमुळे अल्पावधीत खूप लोकप्रिय ठरले आहे. शहरातील गुंडांवर लांडेंचा वचक तर तरुणाईमध्ये चांगली क्रेज आहे. लांडेंची देहबोली चांगल्या चांगल्यांना घाम फोडते. डोळ्यावर काळा गॉगल आणि खाकी वर्दीतली दंबगाई तरुणाई खेचणारी आहे. मात्र, आता तपासणीच्या नावाखाली यूपीच्या मुरादाबादहून शहरात आलेले इन्स्पेक्टर सर्वचंद्र यांना अटक केल्याने लांडे हे स्वत: चौकशीच्या फेर्‍यात अडकले आहेत.

ज्या ठाण्याने सर्वचंद्र यांची राहण्याची व्यवस्था केली त्याच भागाचे एसपी शिवदीप लांडे यांनी त्याला पकडले. अतिरेक्यांना सीम विकत असल्याच्या आरोपाखाली यूपी पोलिस त्रास देत असल्याचा पंकजचा आरोप होता. एसपी लांडे हे अकोला जिल्ह्यातील पारस येथील रहिवासी आहेत. लांडे यांच्यावर पहिल्यांदा लाचखोरीचा आरोप होत असल्याने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. लांडे यांनी कर्तव्य बजावताना खाकी वर्दीपासून चुनरीपर्यंत अनेक वेशभूषा केल्याचे समोर आले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, चौकशीच्या फेर्‍यात सापडले एसपी शिवदीप लांडे यांची छायाचि‍त्रे...