आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पटनायक मंत्रिमंडळात फेरबदल, 10 नवे चेहरे; नव्या मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुवनेश्वर- आेडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी रविवारी आपल्या मंत्रिमंडळात फेरबदल केले. त्यानुसार १० नवीन चेहऱ्यांना नव्या मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. दोन राज्यमंत्र्यांना कॅबिनेटची बढती देण्यात आली आहे.   

आेडिशाच्या दहा मंत्र्यांनी शनिवारी पदाचे राजीनामे दिले. जेणेकरून पटनायक यांच्या फेररचनेच्या योजनेचा मार्ग प्रशस्त झाला. गेल्या तीन वर्षांत पटनायक यांनी फेरबदल करण्याची ही पहिलीच वेळ आहे. राज्यपाल एस.सी जमीर यांच्या उपस्थितीत राजभवनात झालेल्या समारंभात नव्या मंत्र्यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. 

प्रफुल्ल मल्लीक व रमेशचंद्र माझी यांना कॅबिनेटची बढती देण्यात आली आहे. नवीन चेहऱ्यांत एस.एन. पात्रो, निरंजन पुजारी, प्रताप जेना, महेश्वर मोहंती, शशी भूषण बेहेरा, प्रफुल्ल समल यांचा कॅबिनेटमध्ये समावेश करण्यात आला आहे. नृसिंह साहू, अनंत दास, चंद्र सारथी बेहेरा, सुशांत सिंह यांच्याकडे राज्य मंत्रिपद देण्यात आले आहे.  कॅबिनेटच्या सहा तर राज्य मंत्रिपदाच्या चार आमदारांनी रविवारी शपथ घेतली, अशी माहिती मुख्यमंत्री पटनायक यांनी दिली.  २०१४ मध्ये पटनायक सरकार सत्तेवर आले होते. त्यांच्या मंत्रिमंडळात अनेक अनुभवी मंत्री होते. 
बातम्या आणखी आहेत...