आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवन गोयंका मद्रास आयआयटीचे अध्यक्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - मद्रास आयआयटीच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सच्या अध्यक्षपदी उद्योगपती पवन गोयंका यांची नेमणूक करण्यात आली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गोयंका यांची नेमणूक केली आहे. आयआयटी मद्रासची धोरणे ठरवण्यामध्ये गोयंका यांची भविष्यात महत्त्वाची भूमिका राहणार आहे. आयआयटीच्या बैठकीचे अध्यक्षपद त्यांच्याकडे राहील. माझी या पदावर नेमणूक झाली आहे. माझ्यासाठी हा गौरव आहे . ही गोष्ट मी नम्रपणे स्वीकारतो, असे गोयंका यांनी नियुक्तीवर दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.