आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती तुम्हाला सांगेल 4 अपत्ये जन्माला घालायची आहेत तर तुम्ही काय कराल?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- यूपी लोक सेवा आयोगाने 13 ऑक्टोबरला सिव्हिल जज एन्ट्रन्स एग्झाम PCS-J 2016 चा निकाल जाहीर केला. यूपीमधील प्रतापगड जिल्ह्यातील कृती सिंह परीक्षेत 24 वी आली. कृती सिंहने इंटरव्ह्यूमध्ये तिला विचारले प्रश्न आमची सहयोगी वेबसाइट dainikbhaskar.com सोबत शेअर केले आहेत.

प्रश्न: पती तुम्हाला सांगेल 4 अपत्ये जन्माला घालायची आहेत तर तुम्ही काय कराल?
उत्तर: आधी मी त्यांना सांगेल की, हे योग्य नाही. तरीही त्यांनी मान्य केले नाही तर 'राइट टू' अधिकाराचा वापकरून स्पष्ट नकार देईल.

वडिलांच्या एका सल्ल्याने बदलून गेले आयुष्य...
- मूळची प्रतापगड जिल्ह्यातील बहुचरा येथील राहाणार्‍या कृतीचे वडिल नागेंद्र सिंह हे अभियोजन अधिकारी आहेत. एक धाकटा भाऊ आणि बहीणही आहे.
- कृतीने सांगितले की, ''बालपणी मी एक सामान्य विदयार्थिनी होती. वडील ऑफिसात गेल्यानंतर आई आमचा होमवर्क पूर्ण करून घेत होती.
- तिने इंटरमीडिएट बायोलॉजीमधून केले. BSC मध्ये तिला हाच विषय घ्यायचा होता. परंतु तिला वडिलांनी सांगितले, बायोलॉजी विषय घेतला तर CPMT करावे लागेल. ते पूर्ण करण्यासाठी 5-6 वर्षांचा कालावधी लागेल. त्यासाठी मार्क्सही चांगले असणे गरजेचे आहेत.
- वडिलांनी मला लॉ करण्याचा सल्ला दिला. मी त्यांचे ऐकून अलाहाबाद यूनिव्हर्सिटीतून कायद्याची पदवी घेतली. नंतर कोचिंगसाठी दिल्लीत राहिली. एका वर्षाच्या कोचिंगनंतर PCS J परीक्षा दिली. विशेष म्हणजे पहिल्या प्रयत्नातच उत्तीर्ण झाली.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा... या प्रश्नांची उत्तरे देऊन कृतीने उत्तीर्ण केली PCS J
बातम्या आणखी आहेत...