आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारबाबत पीडीपीची भूमिका गोंधळाची - ओमर अब्दुल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्याबाबत पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांची भूमिका ‘गोंधळाची’ आणि ‘आश्चर्यकारक’ आहे, अशी टिप्पणी राज्याचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मंगळवारी केली.

सरकार स्थापनेबाबत मेहबुबा मुफ्ती आणि त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते मुझफ्फर हुसेन बेग यांनी परस्परविरोधी भूमिका घेतली आहे, असा उल्लेख ओमर यांनी केला. मेहबुबा यांनी या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यपाल एन. एन. व्होरा यांची भेट घेतली होती. सरकार स्थापनेपूर्वी केंद्र सरकारने काही विश्वासवर्धक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी पत्रकारांशी बोलताना केली होती. त्यानंतर सोमवारी बेग यांनी जम्मूत स्पष्ट केले होते की, पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी कुठल्याही विश्वासवर्धक उपाययोजनांची मागणी केली नव्हती, तर पीडीपी आणि भाजप यांच्यात संयुक्त कार्यक्रम पत्रिकेची अंमलबजावणी व्हावी, असे म्हटले होते. त्यावर ओमर म्हणाले की, पीडीपी गोंधळात आहे.

७ जानेवारीपासून ‘जैसे थे’
भाजपचे सरचिटणीस राम माधव आणि मेहबुबा मुफ्ती यांच्या भेटीकडे सध्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या भेटीनंतरच सरकार स्थापनेबाबतची पीडीपीची भूमिका समजू शकेल, असे चित्र आहे. मुफ्ती मोहंमद सईद यांचे ७ जानेवारीला निधन झाल्यानंतर राज्यात राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे.