आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PDP Could Take Decision About Government In Todays Meeting

पीडीपीची आज बैठक; सरकारचा फैसला शक्य, मुफ्ती पक्षनेत्यांची भूमिका जाणून घेणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - जम्मू- काश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेली अडथळ्यांची शर्यत संपुष्टात येण्याची चिन्हे दिसू लागली आहे. पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी पक्षाच्या कोअर कमेटीची रविवारी बैठक बोलावली आहे. त्यात सरकार स्थापनेसाठी भाजपसोबत आघाडी करण्यासोबतच पक्षाच्या भावी धोरणांवर चर्चा होणार आहे.

पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, मेहबुबा मुफ्ती यांनी रविवारी दुपारी येथे आमची बैठक बोलावली आहे. त्यात पक्षाचे खासदार, माजी मंत्री तसेच वरिष्ठ पदाधिकारी सहभागी होणार आहेत. त्यांचे पिता व राज्याचे तत्कालीन मुख्यमंंत्री मुफ्ती मुहंमद सईद यांचे सात जानेवारीला दीर्घ आजाराने निधन झाल्यानंतर मेहबुबा यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेली ही पीडीपीची पहिलीच बैठक आहे. एक मार्चपासून सईद यांच्या निधनापर्यंत राज्यात पीडीपी व भाजपचे आघाडी सरकार कार्यरत होते. परंतु त्यानंतर या दोन पक्षांची युती होणार का? या बाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे आठ जानेवारीपासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.
भाजपशी आघाडी करण्याचा अंदाज
भाजपने सरकार स्थापनेबाबत पीडीपीने पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली आहे. पक्षाचे नेते याबाबाबत पीडीपीकडून प्रस्ताव येण्याची वाट पाहत आहेत. पीडीपीने आधी विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड केल्यानंतरच सरकार स्थापनेबाबतची दिशा स्पष्ट होऊ शकेल, असे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे. त्याबाबत पक्षाचे नेते पीडीपी नेत्यांच्या संपर्कात आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

पीडीपीच्या आजच्या बैठकीत मेहबुबा मुफ्ती भाजपसोबत आघाडी करण्याबाबत पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे जाणून घेतील. भाजपसोबत गेल्या १० महिन्यांच्या सरकारच्या समीक्षेचाही बैठकीत आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतरच आघाडीचा िनर्णय घेतला जाणे अपेक्षित आहे.