आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान खानने नाकारली जम्मू-काश्मीर सरकारची ऑफर?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - बॉलिवूड स्टार सलमान खानने जम्मू-काश्मीरच्या पर्यटन विकासासाठीची जाहिरात करण्याचे नाकारले आहे. पीडीपी नेत्यांनी सलमानची भेटे घेऊन त्याला पर्यटन विकासाची जाहिरात करण्याची ऑफर दिली होती, त्याला त्याने नकार दिला आहे. 6 मे पर्यंत कोणतीही नवी ऑफर स्विकारण्याची इच्छा नसल्याचे त्याने शिष्टमंडळाला सांगितले.
का नाकारली ऑफर ?
सूत्रांच्या माहितीनुसार, सलमान खानवर सध्या मुंबईतील हिड अँड रन प्रकरणाचे सावट आहे. या प्रकरणाच्या निकालाची तो वाट पाहात आहे. या खटल्यातून जर तो निर्दोष मुक्त झाला तर जम्मू-काश्मीर सरकारची विनंती मान्य करु शकतो. सलमानच्या प्रवक्त्याने सांगितले, 'जम्मू-काश्मीरच्या टुरिझमला प्रमोट करण्यासाठी ही योग्य वेळ नाही. त्यासाठी राज्य सरकारला थोडी वाट पाहावी लागेल.'
जाहिरातीसाठी मुफ्ती सरकारला का हवा सलमान खान
गेल्या वर्षी आलेल्या महापुरामुळे खोर्‍यातील पर्यटकांची संख्या घटली आहे. त्यामुळे मुफ्ती मोहम्मद सईद सरकार चिंतेत आहे. सलमान सारख्या प्रसिद्ध कलाकाराने आवाहन केल्यास राज्यातील पर्यटनाला चालना मिळेल अशी त्यांना आशा आहे.
सलमान सध्या काश्मीर खोर्‍यात
सलमान खान सध्या पहलगाम येथे बजरंगी भाईजान चित्रपटाची शुटिंग करत आहे. या चित्रपटात त्याची सह कलाकार करीना कपूर आहे. तिच्यासोबत पुढील एक महिना तो खोर्‍यातील विविध लोकेशन्सवर शुटींग करणार आहे. हा चित्रपट यावर्षी ईदच्या दरम्यान प्रदर्शित होणार आहे.
शुटिंगमध्ये व्यस्त, कोर्टात अनुपस्थित
राजस्थानमधील 16 वर्षांपूर्वीचे काळविट शिकार प्रकरण अजून मिटलले नाही. या प्रकरणात सलमानवर अवैध शस्त्र बाळगल्याचा आरोप आहे. या प्रकरणात गुरुवारी त्याला जोधपूर कोर्टात हजर व्हायचे होते, मात्र त्याच्या वकीलांनी कोर्टाला सांगितले, की त्याच्या कानाला संक्रमण झाले आहे. त्यामुळे तो कोर्टात हजर होऊ शकत नाही. त्यानतंर मुख्य जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश अनुपमा बिजलानी यांनी सलमानच्या वकीलांना निर्देश दिले आहे, की येत्या 29 एप्रिलला तो कोर्टात हजर झाला पाहिजे.
फोटो - 'बजरंगी भाईजान'च्या शुटिंग दरम्यान सलमान खान.