आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभ्यासक्रमात धडा; पण न्याय नाहीच, 18 वर्षांपूर्वी दिरांनी चेटकीण ठरवून केला होता अनन्वित छळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धनबाद - मुलांनो सांगा-पेडकीचा पाय केव्हा मोडला होता? तिचे लग्न केव्हा झाले होते? तिने पोलिस ठाणे वयाच्या कितव्या वर्षी पाहिले होते? तिसऱ्या इयत्तेेचे विद्यार्थी आपल्या गणिताच्या पाठ्यपुस्तकात याच प्रश्नांमधून ‘सनावळीचे’ गणित शिकत आहेत.
 
सनावळीचे हे गणित पेडकीदेवीवर झालेल्या अन्यायाच्या वास्तव घटनेवर आधारित आहे. पेडकी धनबाद जिल्ह्याच्या खेडाबेडा गावाची आहे. तिला तिच्याच कुटुंबाने चेटकीण ठरवत छळ केला होता. आती तिची ही कहाणी एनसीईआरटीच्या पुस्तकांत शिकवली जाते. पण पेडकीची पीडा आजही कमी झालेली नाही. कारण घटनेच्या १८ वर्षांनंतरही तिला न्याय मिळालेला नाही.

पेडकीदेवीची कहाणी अत्यंत वेदनादायक आहे. तीत अपमान,घृणा, जखम आणि अन्याय आहे. तिला २२ मार्च १९९९ रोजी तिच्याच कुटुंबातील लोकांनी चेटकीण ठरवून गावात निर्वस्त्र फिरवले होते. तिला विष्ठा खाऊ घालण्यात आली होती. गुप्तांगात रॉड घातला होता. पेडकी सांगते की २२ मार्च १९९९ हा दिवस कधीच विसरू शकत नाही. दुपारची ४:१५ ही वेळ. घरातील एका महिलेच्या आजाराचा दोष त्यांनी मलाच दिला. मला चेटकीण ठरवून छळ करण्यात आला. गावातून पळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी १३ जणांना आरोपीही केले. पण मला आजपर्यंत न्याय मिळाला नाही. माझ्या जीवनातील घटनेला कथा सांगून मुलांना फक्त गणित शिकवले. माझे दु:ख कोणीही समजून घेतले नाही. एनसीईआरटीने पेडकीशी झालेल्या या घटनेचा समावेश तिसरीच्या ‘गणित की जादू’ या पाठ्यपुस्तकात केला.

तेव्हापासून मुले तो धडा शिकत आहेत. पेडकी म्हणते की, छळाचा प्रत्येक क्षण आजही मला भयभीत करतो. मी त्यानंतर कधीही सुखाने झोपू शकले नाही. तो अपमान, ती घृणा, त्या जखमा आजही मला विचलित करतात. सरकारने कुठल्याही विकास योजनेचा लाभ दिला नाही आणि कोणी सोबतही आले नाही. सर्वांना विसर पडला. सरकारलाही आणि माझ्या कुटुंबियांनाबी. कनिष्ठ न्यायालयाने १८ ऑक्टोबर २००४ रोजी शिक्षा सुनावली होती. काही दिवस तुरुंगात राहिल्यानंतर आरोपी बाहेर आले. तीन आरोपींचा मृत्यू झाला आहे. खटला सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. वारंवार रांचीला जाऊन खटला लढवण्याची माझी स्थिती नाही. मी गेल्या ४ वर्षांपासून न्यायालयात गेले नाही.

पुस्तकात अशी आहे पेडकीची कथा
माझे नाव पेडकीदेवी आहे. धनबाद जिल्ह्याच्या (झारखंड) एका गावात मी राहते. शाळेत जाण्याची कधीही संधी मिळाली नाही. १५ वर्षांची असताना माझे लग्न लावण्यात आले. लग्नानंतर तीन वर्षांनी माझ्या पहिल्या मुलीचा जन्म झाला. नंतर मला आणखी तीन मुले झाली, तेव्हा मी २०,२२ आणि २४ वर्षांची होते. ३५ व्या वर्षी माझे पती आजारी पडले आणि त्यांचे निधन झाले. दिरांनी माझे शेत हिरावून घेण्यासाठी मला मारहाण केली आणि म्हटले की, तू चेटकीण आहे. काही चांगल्या लोकांनी मला वाचवले. ज्यांनी मला मारले होते, त्यांच्या विरोधात खटला लढले.
(पुस्तकात छापलेल्या पेडकीच्या वास्तव कहाणीचा मुख्य अंश)
 
बातम्या आणखी आहेत...