आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX - चालत्या कारवर कोसळले झाड; गाडी संपूर्ण चेपली मात्र कोणीही जखमी झाले नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(झाड कोसळल्याने चेपलेली कार)

जालंदर -
पंजाबच्या जालंदरमधील काला सिंघा रोडवर सोमवारी दुपारी पेट्रोल पंपाबाहेर एक 50 वर्ष जुने पिंपळाचे झाड एका कारवर कोसळले. ही कार एका प्रॉपर्टी डीलरची असून सुदैवाने या अपघातात जीवीत हानी झाली नाही.
गुरू हरकृष्ण नगर येथील प्रॉपर्टी डिलर सतनाम सिंह यांची ही कार होती. सतनाम यांच्या पत्नी किरण ह्या समीपूर येथील एका सरकारी शाळेत शिक्षिका आहेत. त्या दररोज मॅडम विनय यांच्यासमवेत एक्टीव्हावर शाळेत जातात. मात्र सोमवारी पाऊस येत असल्याने कारमधून दोघांना शाळेत सोडण्यासाठी जात असताना सतनाम यांच्या मारूती डिझायर या कारवर झाड कोसळले. सुदैवाने कोणीही या अपघातात जखमी झाले नाही.

असे वाटले की मोठ्ठा स्फोट झाला
सकाळी 7.10 वाजता घरातून निघाल्यानंतर 7.20 ला गाडी घास मंडी येथील पेट्रोल पंपाजवळून जात असताना कारच्या मागील भागावर पिंपळाचे झाड जोरात कोसळले. असे वाटले की एखादा स्फोटच झाला आहे. कार जागीच थांबली आणि आवाज ऐकून आसपासचे लोक गाडीकडे धावत आले. सतनाम त्यांची पत्नी आणि शिक्षिका हे गाडीच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होते. मात्र गाडी चपल्याने दार उघडत नव्हते. अशा वेळेस त्यांनी गाडीच्या काचा उघडून ते सर्वजण बाहेर निघाले. कारवर पडल्यानंतर झाड स्वतःच रस्त्यावर कोसळले.
पुढे होऊन बोलत असल्याने वाचला जीव
मॅडम विनय डाव्या बाजूला बसल्या होत्या. मात्र ज्यावेळेस झाड कोसळले तेव्हा त्या समोर सरकून पुढे बसलेल्या किरण यांच्याशी बोलत होत्या. झाड पडल्यानंतर विनय तर वाचल्या मात्र त्या गाडीत आडकल्या. तेव्हा रस्त्यावरून जात असलेले अमरजीत यांनी गाडीकडे धाव घेतली. सतनाम यांच्या मदतीने अमरजीत यांनी विनय यांना बाहेर काढले.
मागील महिन्याभरापासून स्थानिक प्रशासनाकडे केली तक्रार
स्वीफ्ट शिवाय अर्टीगा आणि एक स्कूटरही या झाडाखाली आले. अर्टीगाचे बोनेट तुटले, त्यासोबतच विजेचे चार खांबही खाली कोसळले. या दुर्घटनेच्या एका तासानंतर 108 अँम्बूलन्स घटनास्थळी पोहोचली. किरण आणि विनय यांना जवळील अर्थोनोवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. किरण यांच्या छाती आणि विनयच्या पाठी आणि डोक्यावर खरचटले आहे. प्राथमिक उपचार केल्यानंतर दोघांनाही घरी पाठवण्यात आले. त्यानंतर क्रेनच्या साह्याने रस्त्यावरून झाडाला हटवण्यात आले.

झाड सरळ कोसळले असते तर आम्ही मेलो असतो
सतनाम म्हणाले, की माझ्या गाडीचा वेग 15 ते 20 किमीचा होता. झाड खांबांच्या तारांमुळे गाडीवर अलगद पडले. जर हे झाड थेट गाडीवर कोसळले असते तर आमच्यापैकी कोणची वाचू शकले नसते.

पुढील स्लाईडवर पाहा, या घटनेची आणखी काही छायाचित्रे