आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पेन्शनर्सना ३१ डिसेंबरपर्यंत हयात प्रमाणपत्र देणे गरजेचे, डिजिटल प्रमाणपत्राची अट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - कर्मचारी निवृत्तिवेतन योजना आणि कर्मचारी कौटुंबिक निवृत्तिवेतन योजनेअंतर्गतच्या निवृत्तिवेतनधारकांनी ‘जीवन प्रमाण- आधार’ची डिजिटाइज प्रत ३१ डिसेंबरपर्यंत सादर करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत.

हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी ईपीएफओच्या कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे निवृत्तिवेतनधारकांच्या सोईसाठी डिजिटाइज प्रत देण्याची सोय करण्यात आल्याचे भविष्य निर्वाह निधीचे विभागीय आयुक्त(हैदराबाद) एमएसकेव्हीव्ही सत्यनारायण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.

निवृत्तिवेतनधारकांना ओटीपी प्राप्त करण्यासाठी त्यांनी आधार कार्ड, बँक अकाउंट पासबुक, पेन्शन पेमेंट ऑर्डर नंबर आणि मोबाइल फोन आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. डिजिटाइज प्रत ३१ डिसेंबरपर्यंत सादर केल्यास पीएफ कार्यालय हयात प्रमाण अपडेट करून २०१७ वर्षासाठीचे निवृत्तिवेतन अदा होऊ शकेल.
बातम्या आणखी आहेत...