आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामार्गासाठी स्वत:हून काढले मंदिर-मशीद, रामगडचा आदर्श औरंगाबाद घेणार?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रामगड (झारखंड) - सामाजिक एकोप्याच्या दृष्टीने येथील लोकांनी रविवारी आदर्श घालून दिला. राष्ट्रीय महामार्ग क्र. 33 वर उभी एक मशीद आणि मंदिर त्या-त्या धर्माच्या लोकांनी स्वत:हून काढले. मशिदीतील पवित्र कुराण शहजाद खान यांच्या घरी ठेवण्यात आले तर मंदिरातील काली मातेची मूर्ती विसजिर्त करण्यात आली.
औरंगाबादेतही रस्ता रुंदीकरणाच्या आड येणारी 41 धार्मिक स्थळे काढण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. त्यात 20 मंदिरे, 12 मशिदी, 6 दर्गे आणि 3 मजार आहेत. ती काढताना रामगड आदर्श ठरावा.

पुढील स्लाइडमध्ये, नागरिकांची सदभावना रॅली आणि औरंगाबाद शहरातील अतिक्रमीत धार्मिक स्थळे
रामगडमध्ये दोन्ही धर्माच्या लोकांनी घालून दिलेला आदर्श महाराष्ट्रात जोपासला जावा का... महाराष्ट्रातही अनेक मंदिरे, मशिदी, गुरुद्वारा आणि चर्च प्रस्तावित रस्त्यांच्या मधे येतात... आपल्या प्रतिक्रिया द्या... आमच्या फेसबुक पेजलाही भेट द्या...