आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साइकोने घडवले असे भीषण हत्याकांड, दोघांना चिरले- दाखवू शकत नाही ते PHOTOS...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - शहराच्या पॉश वस्तीत एका सायकोने झोपलेल्या 2 जणांवर फावड्याने वार केले. यात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायकोलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एवढ्या बीभत्स रीतीने हा खून केलाय की याचे फोटो तुम्हाला दाखवू शकत नाही.
 
असे आहे पूर्ण प्रकरण...
- गोमतीनगरच्या विपुल खंडमध्ये शुक्रवारी रात्री पदम नावाच्या एका सायकोने बांधकाम सुरू असलेल्या एका घरात झोपलेल्या दोन मजुरांवर- अजय आणि राजकुमार यांच्यावर फावड्याने वार केले. यात अजयचा जागेवरच मृत्यू झाला. राजकुमार गंभीर जखमी झाला आहे.
- याच खोलीत आणखी काही मजूर झोपलेले होते. आरडाओरड ऐकून त्यांची झोप उडाली, त्यांनी सायकोला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु सायको भिंतीवरून बाजूच्या रिकाम्या घराच्या छतावर गेला.
- घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांवरही सायकोने दगड-विटा फेकल्या. पोलिसांना चिडवण्यासाठी तो शिट्ट्याही वाजवत होता.
 
पोलिसांनी समजूत घातल्यावर उतरला
- यानंतर पोलिसांनी सायकोशी बोलून त्याला खाली उतरवले. पोलिसांनी त्याला म्हटले की, तू आम्हाला तुझा त्रास सांग. आम्ही तो दूर करू. यावर सायकोला पोलिसांवर विश्वास बसला आणि तो छतावरून उतरला. पोलिसांनी त्याला अटक केली. त्याची चौकशी करून घटनेमागील कारणांचा शोध घेतला जात आहे.
 
नेपाळचा राहणारा आहे सायकोने
- याबाबत सर्कल ऑफिसर दीपक सिंह म्हणाले की, खून मानसिकदृष्ट्या आजारी दिसतोय. त्याच्यावर नियंत्रण मिळवायला पोलिसांना खूप प्रयत्न करावे लागले. यात तोही जखमी झाला. पोलिस कोठडीत त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तो नेपाळचा रहिवासी आहे.
 
स्वत:वरचा कंट्रोल गमावतात रोगी: मानसिक रोग विशेषज्ञ
- केजीएमयूचे मानसिक रोग विशेषज्ञ डॉ. एस. सी. तिवारी म्हणाले की, मानसिक रोग्यांचा स्वत:वर कंट्रोल राहत नाही. त्यांच्या मनात ज्या गोष्टी सुरू असतात, त्याला ते हिंसक रूपात उत्तर देत असतात. त्यांना हे भान राहत नाही की, ते स्वत: काय करत आहेत आणि याचे काय परिणाम होतील!
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, घटनेशी निगडित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...