आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर प्रदेशात नाव बुडून १९ प्रवाशांना जलसमाधी; संतप्त जमावाकडून दगडफेक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपघातानंतर वेळेत मदत न पोहोचल्याने संतापलेल्या नागरिकांनी दिल्ली-यमनोत्री हायवेवर रास्तारोको केला. - Divya Marathi
अपघातानंतर वेळेत मदत न पोहोचल्याने संतापलेल्या नागरिकांनी दिल्ली-यमनोत्री हायवेवर रास्तारोको केला.
बागपत- उत्तर प्रदेशच्या बागपतमध्ये गुरुवारी यमुना नदीत नाव उलटून १९ प्रवासी ठार झाले. या नावेची क्षमता फक्त १० प्रवासीच वाहून नेण्याची होती. मात्र, घटनेवेळी त्यात सुमारे ५० प्रवासी होते. यातील १५ जणांना वाचवण्यात यश आले आहे.

दरम्यान, घटनेमुळे संतापलेल्या लोकांनी घटनास्थळी आलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या ताफ्यावर दगडफेक केली. एसडीएमच्या वाहनाची तोडफोड करत त्यास आग लावण्याचाही प्रयत्न केला. एका ट्रकला पेटवून देण्यात आले. यात काही माध्यम प्रतिनिधींनाही दुखापत झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलिस दल पाठवण्यात आले. बागपतचे जिल्हाधिकारी भवानी सिंह खंगारोत यांच्या मते, ही घटना सकाळी सुमारे ७.४५ वाजता घडली.
क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसल्याने ती उलटली. आपत्ती व्यवस्थापन चमू आणि स्थानिक लोकांच्या मदतीने मृतदेह काढण्यात आले.
 
बोटमध्ये बसले होते क्षमतेपेक्षा जास्त लोक...
- पोलिसांनी आतापर्यंत सहा मृतदेह बाहेर काढले आहेत. इतरांचा शोध सुरु आहे.
- क्षमतेपेक्षा जास्त लोक बोटीत बसल्याने दूर्घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

मृतांच्या वारसाला 2 लाखाची मदत
 - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बागपत येथील दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे.
- मृतांच्या वारसाला 2 लाख रुपये मदत देण्याची घोषणा ही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... दुर्घटनेची भीषणता दर्शवणारे फोटो...
बातम्या आणखी आहेत...