आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एवढा भीषण अपघात, 100 च्या स्पीडमध्ये ट्रकखाली घुसली कार, कटरने कापून काढले 6 मृतदेह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायबरेली - यूपीच्या रायबरेलीमध्ये रोड अॅक्सिडेंटमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी एक अनियंत्रित कार डिव्हायडर तोडून ट्रकमध्ये शिरली. या अपघातात कारमध्ये स्वार 6 जणांचा जागेवरच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.
 
कार कापून काढावे लागले मृतदेह
-रायबरेलीच्या बछरांवामध्ये विशाखा सिमेंट कारखान्याजवळ हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 6.40 वाजता लखनऊकडून येणारी फोर्ड फिगो कार अनियंत्रित होऊन डिव्हायडर तोडून ट्रकमध्ये शिरली. या अपघातात 6 जणांचा जागेवरच मृत्यू झाला.
- अपघात एवढा भीषण होता की, 2 मृतदेह कारमध्ये फसून बसले होते, कारचा पत्रा कापून ते बाहेर काढावे लागले. मृतांची ओळख पटवण्यात आली आहे. सर्व जण एकाच कुटुंबातील आहेत.
 
पोस्टमॉर्टमसाठी पाठवले मृतदेह
- अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांचे अधिकारी पोहोचले. त्यांनी स्पॉटचे निरीक्षण केले. दुसरीकडे स्थानिक लोकांना याबाबत माहिती कळताच त्यांनी तेथे गर्दी करायला सुरुवात केली.
- पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. 
- महाराजगंजचे सीओ गोपीनाथ सोनी म्हणाले- अपघात खूप भीषण होता. कारमध्ये स्वार 6 जण मृत्युमुखी पडले आहेत.
 
मृतांची नावे
1. दिव्य कुमार मिश्र
2. शक्ति मिश्र
3. दिव्या मिश्रा
4. दीपिका मिश्र
5. अर्पित मिश्र
6. ज्योति पांडेय
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित घटनेचे आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...