आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • People From Other States Should Learn Kannad Says Karnataka Chief Minister

परप्रांतीयांनी कन्नड शिकली पाहिजे, कर्नाटकच्‍या मुख्‍यमंत्र्यांचे 'ठाकरी' फटकारे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू- इतर राज्यांतून कर्नाटकात आलेल्या नागरिकांनी कन्नड भाषा शिकली पाहिजे, असे मत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केले आहे. कर्नाटकच्या 58 व्या स्थापनादिवसनिमित्त ते बोलत होते.

जे लोक परराज्यातून आलेले आहेत त्यांनी स्थानिक भाषा आत्मसात केली पाहिजे. राज्यातील सर्व सुखसुविधांचा उपभोग घेत आहात, सरकारकडून दिले जाणारे सगळ्या योजनांचे लाभ घेत असाल तर स्थानिक भाषा आणि संस्कृती शिकणेही आवश्यक आहे, असे त्यांनी परप्रांतीयांना ठणकावले. कोणतेही कारण असो, राज्यातील कन्नड माध्यमाची एकही शाळा बंद के ली जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. अधिकाधिक मुलांनी शाळांमध्ये प्रवेश घ्यावा यासाठी कन्नड शाळांमध्ये सुविधा वाढवण्यात येतील. इंग्रजी माध्यमांमधील शिक्षण म्हणजे निव्वळ व्यापार झाला आहे, असे ते म्हणाले.