आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेघालयामधील 300 लोकांना आधार नको; बाहेरचे लोक मतदार होऊ नयेत म्हणून मोहीम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिलाँग- केंद्र सरकार ‘आधार’ला भारतीय नागरिकांची आेळख बनवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु मेघालयात आधार नको, अशी मागणी करणारी मोहीम सुरू झाली आहे. प्रत्यक्षात ३०० जणांनी क्रमांक सोडण्याची तयारी दर्शवली आहे.

आधारच्या बारा अंकी आेळख क्रमांकामुळे मूळ निवासी नागरिकांना मतदानाचा अधिकार मिळू शकतो, असा या लोकांचा तर्क आहे. एकूण २८६ जणांनी आधारसंबंधी मेघालय पिपल कमेटीला (एमपीसीए) मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी पत्र सोपवले. आधारच्या डेटाबेस मधून ही नावे वगळण्यात यावी, अशी विनंती या लोकांनी केली आहे. एमपीसीएचे सचिव ऑगस्ट जायरवा म्हणाले, आमची मोहिम सुरू आहे व तीन नोव्हेंबरपर्यंत ती सुरूच राहणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्या अगोदर अशी मागणी करणारी पुरेशी संख्या निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे. मेघालयात सुमारे ४.६ लाखाहून अधिक लोकांकडे आधार क्रमांक आहे. त्यासाठी नोंदणी सुरू आहे, असे यूआयडीएआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

मेघालयात जूनमध्ये आधारची नोंदणी सुरू झाल्यानंतर त्याच्या प्रक्रियेला विरोध होत होता. खासी विद्यार्थी संघटनेने आधारमुळे वैयक्तिक गोपनीयतेचा भंग होतो, असा आरोप करून आधारला विरोध दर्शवला आहे. या संघटनेचा प्रदेशात प्रभाव असल्याचे मानले जाते.
बातम्या आणखी आहेत...