आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • People On Great Wall Of India For Kumbhalgadh Festival

महाराष्ट्राची लावणी पाहण्यासाठी 'ग्रेट वॉल ऑफ इंडिया' वर चढले लोक, पाहा PHOTO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - लावणी सादर करताना महाराष्ट्राचे कलाकार.
कुंभलगड/उदयपूर - तीन दिवसीय कुंभलगड महोत्सवात परदेशी पर्यटकांनी जोरदार जल्लोष केला. दिवसा राजस्थानी तर रात्री गुजरात, गोवा आणि महाराष्ट्राच्या कलाकारांनी लोककलांवर आधारित सादरीकरण केले. अखेरच्या दिवशी मेंदी स्पर्धा, रस्सी खेच, अशा स्पर्धांमध्ये परदेशी पाहुण्यांनी उत्साहात सहभाग नोंदवला. हा महोत्सव एवढा भव्य होता की, किल्ल्याच्या भींतीवर चढून लोकांनी हा कार्यक्रम पाहिला.

कुंभलगडची भिंत जगातील दुसरी सर्वात मोठी
जगातील सर्वात मोछी भिंत ग्रेट वॉल ऑफ चायना नंतर जगातील दुसर्‍या क्रमांकाची सर्वात मोठी भिंत ही राजस्थान राज्यातील कुंभलगढ किल्ल्याची भिंत आहे. तिलाच 'ग्रेट वॉल ऑफ इंडिया' म्हटले जाते. उदयपूरपासून 64 किमी अंतरावर असलेल्या या किल्ल्याची निर्मिती महाराणा कुम्भा यांनी 15 व्या शतकात केली होती. किल्ल्याचा घेर सुमारे 36 लांबीचा आहे. त्यामुळेच ही भिंत जगातील दुसर्‍या क्रमांकाची सर्वात मोठी भिंत आहे.
महोत्सवाचे आकर्षण
> भरतपूरच्या कलाकारांचे मयूर नृत्य
> महाराष्ट्राच्या कलाकारांचे लावणी नृत्य
> चवरी नृत्य
> गोव्याचे सवई नृत्य
> कालबेलिया, चकरी, कच्छी घोडी नृत्य, लाल आंगी गैर व सफेद आंगी गैरचे सादरीकरण.
भिंतावर गावकर्‍यांची गर्दी
कुंभलगड महोत्सवाच्या अखेरच्या दिवसी परदेशी पर्यटकांसह आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिकांचीही मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. किल्ल्याच्या भिंतीवर सकाळपासूनच स्थानिक महिलांसह मुलेही होती. सर्वांनी भिंतीवर बसूनच कार्यक्रमाचा आंद लुटला.
पुढील स्लाइड्वर पाहा, PHOTO