सिमला (हिमाचल प्रदेश)- पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सिमल्यात आता कार पार्क करण्यासाठी जागा राहिलेली नाही. उंच-सखल भागात अशा प्रकारे घरे बांधण्यात आली आहेत, की घरासमोर गाडी लावता येत नाही. यामुळे लोकांनी नवीन शक्कल शोधून काढली आहे. एखाद्या घराची गच्ची जर रस्त्याच्या उंचीची असेल तर त्यावर परिसरातील लोक कार पार्क करतात. त्याचे रितसर शुल्कही देतात. घराची गच्ची आणि रस्ता यामधील अंतर सिमेंटचा पूल बांधून मिटवतात.
गेल्या वर्षी हिमाचल सरकारने पब्लिक-प्रायव्हेट भागीदारीतून शहरातील 71 जागांवर पार्किंग उभारण्याची योजना आखली होती. यावर सुमारे पाच हजारांपेक्षा जास्त कार उभ्या करता येणार आहेत. यातील पाच मल्टीलेव्हल पार्किंग आहेत. परंतु, अद्याप या जागा तयार झालेल्या नाहीत.
पुढील स्लाईडवर बघा, सिमलावासियांनी कार पार्किंगची कशी शक्कल लढवली आहे...