आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलाम यांना रामेश्वरममध्ये लाखो चाहत्यांनी दिला निरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रामेश्वरम - डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना अखेरचा निरोप देण्यासाठी किती व्हीव्हीआयपी येथे आले याची आकडेवारी कदाचित अधिकारी देऊ शकतील. मात्र, त्यांच्या चाहत्यांच्या संख्येचा अंदाज लावणे मात्र अगदी अशक्य होते. कदाचित लाख, दोन लाख... यापेक्षाही अधिक.
रामेश्वरमची लोकसंख्या ५० हजारांपेक्षा अधिक नाही. येथे दरवर्षी २ लाख पर्यटक येतात. मात्र, गेल्या तीन दिवसांत येथे एक लाखाहून अधिक लोक डॉ. कलाम यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आले आहेत. हजारो लोक अनवाणीच आहेत.

कलाम यांच्या घराकडे येणारे आणि परतणारे, सर्वच जेवढे अस्वस्थ तेवढाच त्यांना अभिमानही आहे. रस्त्यांवर एखाद्या उत्सवासारखी वर्दळ. गुरुवारी डॉ. कलाम यांच्या स्मरणार्थ तमिळनाडू बंद होते. पेट्रोल पंपही बंद राहिले. मच्छिमारांनीही आपल्या नौका किनारीच ठेवल्या. कलाम यांच्यावर अंत्यसंस्कार झाले तेव्हा एक लाखाहून अधिक लोक कडक उन्हात उभे होते. यात काही पोलिस हा दु:खाचा क्षण आपल्या मोबाइलमध्ये साठवून ठेवत होते. महिला पोलिसांच्या अश्रूंना बंाध नव्हता. ज्याच्या त्याच्या चेह-यावर होते फक्त दु:खच. ज्या ठिकाणी कलाम यांचे पार्थिव दफन करण्यात आले त्या भागातील लोक दिवसभर प्रत्येकाला पाणी देऊन सेवा करत राहिले. बुधवारी हॉटेल आणि लॉज भरले तेव्हा गावक-यांनी येणा-या लोकांना आपल्या घरी आसरा दिला.

सैनिकांच्या खांद्यावर कलाम यांची अंत्ययात्रा निघाली तेव्हा ‘भारत माता की जय’च्या घोषणा दुमदुमल्या. येथे इमात आणि हिंदू पंडितही होते. कारण डॉ. कलाम कुराण आणि गीतेचे तेवढ्याच श्रद्धेने पठण करत. ज्यांनी कबर खोदली ते बी. गणेशनही हिंदूच. गणेशनना शास्त्रज्ञ म्हणजे काय माहीत नव्हते. मात्र, कलाम या गावचे राष्ट्रपती झालेले सुपुत्र आहेत हे त्याला ज्ञात होते. रोजी तीन कबरी खोदणा-या गणेशनना ही कबर खोदणे मात्र खूप कठीण होते...