आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सपाच्या माजी आमदार पूत्राने नशेत कार चालवत 10 लोकांना चिरडले, 4 ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - येथील डालीबाग परिसरात शनिवारी मध्यरात्रीनंतर साधारण 1.25 वाजता भरधाव वेगात आलेली कार तात्पूरत्या निवाऱ्यात घुसली आणि 10 लोकांना चिरडत गेली. बड्या बापांच्या नशेत धुंद झालेल्या दोन दिवट्यांनी दारुच्या नशेत 4 मजूरांना ठार केले. अपघातात दोन जण जागेवरच दगावले तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 6 जखमींपैकी तिघांना ट्रॉमा सेंटरमध्ये हलविण्यात आले आहे. कार समाजवादी पक्षाचे माजी आमदार अशोक रावत यांचा मुलगा आयुष चालवत होता. त्याच्यासोबत एका बिझनेसमॅनचा मुलगा- निखील होता. दोघेही दारुच्या नशेत होते. 
 
- पोलिसांनी सांगितले, की डालीबाग भागात तयार करण्यात आलेल्या निवाऱ्यात रोज साधारण 50 लोक झोपलेले असतात. शनिवारी येथे 50-60 लोक होते. 
- प्रत्यक्षदर्शीने सांगितले, की रात्री सव्वा ते दीड वाजता दरम्यान भरधाव वेगात आलेली कार  (UP32GH7788) निवाऱ्यात घुसली आणि लोकांना फरफट दुसऱ्या टोकापर्यंत घेऊन गेली. पुढे एका खांबाला टक्कर देऊन कार उलटली. 
- कारखाली आल्याने दोन जणांचे डोके चिरडले गेले. त्यांची ओळख पटली असून त्यांचे नाव पृथ्वीराज आणि गोकर्ण असल्याचे कळाले. दोघेही बहराइच येथील मटिहा गावचे रहिवासी होते.
- सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले अब्दुल कलाम नावाच्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हॉस्पिटलमध्ये मृत्यू झालेल्या दुसऱ्या व्यक्तीची ओळख पटू शकली नाही.
- अपघातात जखमी झालेले बहुतेक सर्व जण बहराइच येथील आहेत. 
 
आयुष-निखिलला उभे राहाता येत नव्हते
- कार निवाऱ्यात घुसून उलटल्यानंतर दोन जण त्यातून बाहरे पडले. ते दोघेही दारुच्या नशेत असल्याचे दिसत होते. त्यांना सरळ उभे राहाता येत नव्हते. 
- घटनेनंतर लोक व पोलिसांनी तत्काळ 108 क्रमांकावर कॉल करुन अॅम्बूलन्स बोलावली. मात्र घटनेनंतर 35 मिनिटांनी अॅम्बूलन्स आली. 
- तोपर्यंत पोलिसांनी आपल्या गाडीतून जखमींना हॉस्पिटलमध्ये पोहोचवले होते, असे हजरतगंज पोलिस स्टेशनचे प्रभारी डी.के.उपाध्याय यांनी सांगितले. 
 
 (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...