आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • People Ties Buffalo On Airport Runway In Bhagalpur

पूरग्रस्तांचा संताप : विमानतळाच्या रनवेवर बांधल्या म्हशी, भिंत पाडून मिळवला ताबा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अनेक दिवस वाट पाहूनही मदत मिळाली नाही म्हणून संतपप्त पूरग्रस्तांनी भागलपूर विमानतळाचा ताबा घेतला.)

पटना/ भागलपूर - पुरामुळे विस्थापित झालेल्या पूरग्रस्तांना शुक्रवारी राग अनावर झाला. त्यामुळे थेट विमानतळाची भिंत पाडून सुमारे 500 पूरग्रस्तांनी रनवेवरच तळ ठोकला. पूरग्रस्तांनी याठिकाणीच दावं ठोकून म्हशीदेखिल बांधल्या आहेत. हे सर्व पूरग्रस्त नारायणपूरच्या शहजादपूरचे आहेत.
बिहारचे मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी जलसंपदा मंत्री विजय कुमार चौधरी यांच्यासह शुक्रवारी पूरग्रस्त जिल्ह्यांची हवाई पाहणी केली. तसेच प्रमुख अधिका-यांबरोबर त्यांनी सहरसा आणि इतर पूरग्रस्त जिल्ह्यांची पाहणीही केली. राज्यात पूरस्थितीने राजधानी पटनासह 14 जिल्ह्यांमध्ये थैमान घातले आहे.
मुख्यमंत्र्यांनी मदतकार्याचा वेग वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला कोणत्याही परिस्थितीत एक-एक क्विंटल धान्य आणि ठरावीक रोख रक्कमही दिली जाणार आहे. पूरग्रस्तांना वेळेवर मदत न मिळाल्याच्या प्रकाराची चौकशी करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

केन्द्रीय गृहमंत्र्यांशी संपर्क नाही
अनेक प्रयत्नांनंतरही केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी बोलणे होत नसल्याचे मुख्यमंत्री मांझी यांनी सांगितले. गृहमंत्री सर्वेक्षणाला गेल्याने चर्चा झाली नाही. पुन्हा त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच परिस्थिती अत्यंत वाईट असली तरी या पुरामध्ये फार मोठे नुकसान झाले नसल्याचेही त्यांनी मान्य केले आहे.

प्रमुख नद्यांच्या जलपातळीत वाढ सुरुच
गंगा नदीसह सर्व प्रमुख नद्यांच्या जलपातळीमध्ये वाढ होण्याचा प्रकार शुक्रवारीही सुरू होता. गंगा, बुढ़ी गंडक, गंडक, महानंदा, घाघरा या नद्यांच्या पातळीमध्ये वेगाने वाढ होत आहे. घाघरा नदी तर विक्रमाच्या जवळ पोहोचली आहे. एवढेच नव्हे तर गेल्या 24 तासांत बागमती आणि अधवारा समुहातील नद्यांचा जलस्तर जराही कमी झालेला नाही.

पुढील स्लाइड्सवर पाहा फोटो...