आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एवढा भीषण अपघात की धडावेगळे झाले होते शरीर, असे लटकलेले होते मृतदेह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कानपूर (यूपी) - येथे शुक्रवारी सकाळी ट्रक आणि डंपरची भीषण धडक झाली. या धडकेमुळे एक बाइकस्वारही अपघातग्रस्त झाला. यात 5 जणांचा मृत्यू झाला असून 9 जण गंभीर जखमी आहेत. आवाज ऐकून घटनास्थळी लोकांनी धाव घेतली. प्रत्यक्षदर्शी दयाल म्हणाले, आवाज ऐकून आम्ही पोहोचलो. ट्रकमधून मृतदेह बाहेर लटकलेले होते. त्यांचे धड शरीरावेगळे झाले होते.

 

मृतदेह ओढून काढले बाहेर...
- घटना सजेती येथील नॅशनल हायवे 86 च्या अनुपूर वळणावर झाली. येथे हमीरपूरकडून मौरंगकडे भरधाव डंपर समोर येत होता.
- तेवढ्यात घाटमपूरकडून प्रवाशांना घेऊन येणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक झाली. अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
- पोलिस आणि गावकऱ्यांनी दीड तासांच्या मदत कार्यात मृतदेहांना खेचून बाहेर काढले. सोबत 5 जखमींनाही घाटमपूरच्या सरकारी रुग्णालयात आणि 4 जणांना हॅलट रुग्णालयात दाखल केले.

 

मृतांची नावे
# बाबूराम (40) जगन्नाथ रा. इंगोटा, हमीरपुर.
# सुरेंद्र (42) रामस्वरूप रा. मौदहा, हमीरपुर.
# संजीव सिंह (25) मुन्नी सिंह रा. अमौली, सजेती.
# राजेन्द्र (32) बिंदा प्रसाद रा. मौदहा, हमीरपुर.
# एका अज्ञाताची ओळख पटवणे सुरू आहे.


पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या भीषण अपघाताचे आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...