आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवस्र सापडला परफ्यूम एक्सपर्ट मोनिका घुरडेंचा मृतदेह, बलात्कार झाल्याचा संशय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी (गोवा)- नामवंत परफ्यूम एक्सपर्ट मोनिका घुरडे यांच्यावर बलात्कार करुन हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. गोव्यात एका भाड्याच्या घरात घुरडे राहत होत्या. गुरुवारी रात्रीच्या सुमारास बलात्कार आणि हत्या झाली असावी असा पोलिसांना संशय आहे. हात-पाय बांधलेल्या अवस्थेत आणि विवस्र मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.
मोनिकाचा घुरडे यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून शेजाऱ्यांकडे चौकशी करण्यात येत आहे. मोनिकाच्या घरातून काही वस्तू आणि दागिने चोरण्यात आले आहेत. त्यामुळे हे चोरीचे प्रकरणही असू शकते. पण ज्या पद्धतीने बलात्कार आणि खून झाला आहे, त्यावरुन पोलिस सखोल तपास करत आहेत. एखाद्या जवळच्या व्यक्तीचेही हे कृत्य असू शकते असेही सांगितले जात आहे.
वडील होते जज
मोनिकाचे वडील मुंबईत सरकारी वकील होते, नंतर ते न्यायाधीश म्हणून निवृत्त झाले होते.
ही हत्या कौटुंबिक वादातून झाली की दुसरे काही कारण आहे याचा पोलिस शोध घेत आहेत.

पोलिस काय म्हणाले
- गोवा पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
- रिपोर्टनुसार, पोलिसांनी विवस्त्र आवस्थेत मृतदेह आढळला. तिचे हात आणि पाय बांधलेले होते.
- हा दरोड्याचाही प्रकार असू शकतो, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
- पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविला असून अंतिम अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण कळू शकेल असे पोलिसांनी म्हटले आहे.
- पोलिसांनी मोनिकाच्या शेजाऱ्यांकडे विचारपूस सुरु केली आहे.
- अनेक सुगंधाची पारख असलेली मोनिका परम्यूम डिझायनर होती. भारतातील प्रसिद्ध परम्यूम एक्सपर्ट म्हणून तिने नाव कमावले होते.
जीआएएफची केली स्थापना
- मुंबईच्या जेजे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट्समधून ग्राफिक डिझाईन आणि फोटोग्राफित मोनिका यांनी पदवी प्राप्त केली होती.
- 2005 मध्ये भारत रामामरुथम यांच्यासोबत डिझाईन अॅण्ड पब्लिशिंग कंपनी जीआएएफ या संस्थेची स्थापना केली.
-मोनिका घुरडे यांनी एक वेबसाईटही आहे. http://www.monikaghurde.com/about/
- जीआएएफच्या क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि पार्टनर असल्याने मोनिका डिझाईन आणि व्हिज्युअल आसपेक्टवर काम करत होत्या.
- 1999 मध्ये मोनिका यांना जेजे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्टकडून बेस्ट कलर फोटोग्राफिचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.
- 2005 मध्ये कम्युनिकेशन आर्ट्स अवार्ड फॉर फोटोग्राफीकडून अवार्ड ऑफ एक्सलंस हा पुरस्कार देण्यात आला होता.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, मोनिका घुरडे यांचे काही फोटो....
बातम्या आणखी आहेत...