आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोनिकावर एकतर्फी प्रेम, गेली नोकरी, RAPE पूर्वी दाखवली पॉर्नफिल्म; मारेकऱ्याची कबुली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोनिका घुरडे - Divya Marathi
मोनिका घुरडे
पणजी (गोवा)- प्रसिद्ध परफ्युम एक्सपर्ट मोनिका घुरडे हिच्या मारेकर्‍याने धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने सांगितले, की मोनिका घर बघायला आली होती तेव्हाच मला आवडली होती. घटनेनंतर सोडून दिले तर पोलिसांना सगळी हकिकत सांगेल, अशी भीती असल्याने तोंडावर उशी ठेवून तिला ठार मारले. त्यापूर्वी तिला तीन पॉर्नफिल्म दाखवल्या. त्यानंतर हातपाय बांधून बलात्कार केला.
39 वर्षीय मोनिका घुरडेच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी पोलिसांनी सोसायटीचा 21 वर्षीय सुरक्षा रक्षक राजकुमारसिंग याला अटक केली आहे. त्याने आता संपूर्ण घटनाक्रम सांगितला असून बरेच धक्कादायक खुलासे केले आहेत.
पहिल्या नजरेतच आवडली होती
राजकुमारसिंग सुरक्षा रक्षक असलेल्या अपार्टमेंटमध्ये मोनिका घुरडे भाड्याचा फ्लॅट बघायला आली होती. तेव्हाच राजकुमारला ती आवडली होती. तिच्यासोबत बोलण्याचा तो प्रयत्न करायचा. तिला वारंवार बघायचा. तिचा संपूर्ण शेड्युल त्याला माहिती होता.
मोनिकाची कार धुवायचा राजकुमार
यासंदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकारी विनोद गुप्ता यांनी सांगितले, की आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. घटनेपूर्वी दोन दिवस राजकुमार हा मोनिकाच्या गच्चीवर लपून होता. त्यानंतर त्याने मोनिकाच्या फ्लॅटमध्ये प्रवेश केला होता. राजकुमारला ती पहिल्याच नजरेत आवडली होती. ड्युटी संपल्यावर राजकुमार सोसायटीतील लोकांच्या कार धुवायचा. मोनिकाची कारही तोच धुवायचा.
बलात्कारापूर्वी दाखवल्या पॉर्नफिल्म
घरात प्रवेश केल्यावर राजकुमारने मोनिकाला चाकूचा धाक दाखवला. तिला बळजबरी बाथरुममध्ये घेऊन गेला. यावेळी झालेल्या झटापटीत तिची शुद्ध हरपली. त्यानंतर त्याने तिला ओढत बेडरुममध्ये नेले. बेडला तिचे हात पाय बांधले. या दरम्यान ती शुद्धीवर आली. त्याने तिच्याकडे पैशांची मागणी केली. तिने पर्समधील चार हजार रुपये घेण्यास सांगितले. त्यानंतर एटीएम कार्डही त्याच्या सुपूर्त केले. त्याने तिच्याकडून एटीएम पीन आणि मोबाईलचा पासवर्ड घेतला. तिने त्याला सोडण्याची विनंती केली. पण राजकुमारने तिला तीन पॉर्नफिल्म दाखवल्या. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. ही घटना ती पोलिसांना सांगेल अशी त्याला भीती होती. त्याने उशीने तोंड दाबून तिची हत्या केली.
मोनिकामुळे गेली होती नोकरी
पंजाबच्या भटिंडा येथील रहिवासी असलेला राजकुमार याची नोकरी मोनिका आणि आणखी काही सोसायटीच्या लोकांमुळे गेली होती. मोनिकाची चोरीला गेलेली छत्री त्याच्याजवळ सापडली होती. नोकरी गेल्यावर त्याने अनेक ठिकाणी रोजगार मिळवण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान सुरक्षा एजन्सीने त्याचा दोन महिन्यांचा 24 हजार रुपये पगारही दिला नाही. यावेळी तो मोनिका यांच्याकडे माफी मागण्यासाठीही आला होता. तुम्ही तक्रार मागे घ्या, असेही तो म्हणाला होता.
छत्री चोरल्याने गार्डला हटकले होते...
मोनिकाने काही दिवसांपूर्वी आरोपी राजकुमारला छत्री चोरताना पाहिले होते. इतकेच नव्हे तर त्याला हटकलेही होते. मोनिकाने सगळ्यांसमोर त्याला चांगलेच खडसावले होते. राजकुमारने अपमानाचा बदला घेण्यासाठी मोनिकाची निर्घृण हत्या केली. नंतर मोनिकाचा मोबाइल आणि एटीएम कार्ड घेऊन तो पसार झाला होता. पण, दोन दिवसांपूर्वी त्याने फेसबुकवर सेल्फी अपलोड केल्याने तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला.

असा जाळ्यात सापडला राजकुमार...
- गोवा आणि बंगळुरु पोलिसांनी संयुक्त कामगिरी करून आरोपी राजकुमारला अटक केली.
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजकुमार मागील सहा महिन्यांपूर्वी नोकरीवर आला होता. पण मोनिकाच्या हत्येनंतर तो फरार झाल्याचे समोर आले होते.
- पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला होता. पण त्याचा मोबाइल बंद होता. या काळात त्याने पणजीतून मोनिकाचे एटीएम कार्ड वापरून पैसेही काढले होते.
- डीआयजी विमल गुप्ता यांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेज आणि फरार गार्डचा फोटो मॅच करुन पाहिले असता, राजकुमार यानेचे मोनिकाची हत्या केली, हे स्पष्ट झाले. - राजकुमारने रविवारी बंगळुरुतून 50 हजार रुपयांचे ट्रान्झेक्शन केले. पोलिस त्याच्या फेसबुक अकांउटवरही लक्ष ठेऊन होते.
- यादरम्यान राजकुमारने फेसबुकवर एक सेल्फी अपलोड केला. फोटोच्या बॅकग्राउंडवरून तो बंगळुरुत असल्याचे पोलिसांना समजले.
- गोवा पोलिसांनी बंगळुरु पोलिसांशी संपर्क साधून त्याचा शोध सुरु केला. बंगळुरुमधील हॉटेल, लॉज पोलिसांनी अक्षरश: पिंजून काढल्या. एका हॉटेलमधून राजकुमारला अटक केले.

कोण होती मोनिका?
- मोनिका नागपूरची राहाणारी होती. तिचे वडील मुंबईतील एका कोर्टात न्यायाधीश आहेत.
- मुंबईच्या जेजे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट्समधून ग्राफिक डिझाईन आणि फोटोग्राफित मोनिका यांनी पदवी प्राप्त केली होती.
- 2005 मध्ये भारत रामामरुथम यांच्यासोबत डिझाईन अॅण्ड पब्लिशिंग कंपनी जीआएएफ या संस्थेची स्थापना केली.
- मोनिका घुरडे यांनी एक वेबसाईटही आहे. http://www.monikaghurde.com/about/
- जीआएएफच्या क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि पार्टनर असल्याने मोनिका डिझाईन आणि व्हिज्युअल आसपेक्टवर काम करत होत्या.
- 1999 मध्ये मोनिका यांना जेजे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्टकडून बेस्ट कलर फोटोग्राफिचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.
- 2005 मध्ये कम्युनिकेशन आर्ट्स अवार्ड फॉर फोटोग्राफीकडून अवार्ड ऑफ एक्सलंस हा पुरस्कार देण्यात आला होता.

पुुढील स्लाइड्‍सवर पाहा, मोनिका घुरडे हिचे काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...